शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी असताना समितीची गरज काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:25 IST

गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण .....

ठळक मुद्देवहाणगाववासीयांचा पोलिसांना सवाल : पोलीस आल्यापावली परतले

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : गावातील अवैध दारूबंदीसाठी वहाणगाव येथील नागरिकांनी अभिनव आंदोलन उभारून जिल्हा प्रशासनापुढे आव्हान उभे केले होते. २ सप्टेंबरला वहाणगाव येथील ग्रामसभेने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव एकामताने पारीत करून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले. या ग्रामसभा ठरावाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळी ७.३० वाजता शेगावचे ठाणेदार सुभाष बारसे यांनी दारूबंदी समितीच्या गठित करण्यासाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र उपसरपंच प्रशांत कोल्हे व नागरिकांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना गावात दारूबंदी समितीची गरज का? असा सवाल केल्याने ठाणेदारांना वहाणगावातून आल्यापावली परत जावे लागले.जिल्ह्यात दारूबंदी असतानाही वहाणगावात मुबलक प्रमाणात दारूची विक्री होते. त्यामुळे वहाणगावात परिसरातील अनेक गावातील तडीराम आपली लत भागवण्यासाठी वहाणगावचा रस्ता धरतात. या तडीरामांमुळे गावातील विद्यार्थिनी, महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतो.या त्रासाला कंटाळून गावातील अवैध दारू हद्दपार करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले व अवैध दारूबाबत प्रशासनाच्या ठोस धोरणाचा अभावामुळे गावातील महिलांनी प्रशासनाला वटणीवर आणण्याच्या दृष्टीने अभिनव आंदोलन उभे केले. २ सप्टेंबरला ग्रामसभेत एकमताने ग्रामपंचायतीने फलक लावून दारूविक्री करण्याचा ठराव पारीत केला व दारूबंदीला चांगलीच चपराक दिली. या ग्रामसभेच्या ठरावामुळे वहाणगाव एकाच दिवशी राज्याच्या पटलावर गाजले.मागील काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीच्या विषयावरून वहाणगावात सुरू असलेल्या अभिनव आंदोलनामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन ढवळून निघाले आहे. त्या दृष्टीने बुधवारी सकाळी शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष बारसे आपल्या ताफ्यासह वहाणगावात दारूबंदी समिती गठित करण्यासाठी आले. सभेकरिता उपसरपंच प्रशांत कोल्हे, सचिन डी.पी. डाखोरे यांच्यासह ६० नागरिक उपस्थित होते.शासनाच्या भूमिकेशिवाय गावकºयांचे सहकार्य नाहीठाणेदार सुभाष बारसे यांनी गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्रामवासीयांची मदत गरजेची आहे. त्यादृष्टीने दारूबंदी समिती गठित करण्यास सुरूवात केली. मात्र उपसरपंच व गावकºयांनी जिल्ह्यात दारूबंदी असताना समितीची गरज काय? गावकºयांनी दारू सुरू करण्याबाबत ठराव घेतला असून शासन जेव्हापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार नाही, तोपर्यंत गावकरी सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यामुळे ठाणेदारासह पोलीस प्रशासनाला आल्यापावली वहाणगाव येथून परत जावे लागले आहे. त्यामुळे वहाणगावबाबत प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.