शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

निरपराध्याला मारहाण करणारी ही कसली मानसिकता?

By admin | Updated: September 4, 2015 00:56 IST

गुन्हेगारांवर अंकुश ठेवून निरपराध आणि सामान्य जीवन जगणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे पोलिसांकडून अपेक्षीत आहे.

व्यापाऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया : ‘त्या’ पोलिसांवर गुन्हे नोंदवा, निलंबन कराचंद्रपूर : गुन्हेगारांवर अंकुश ठेवून निरपराध आणि सामान्य जीवन जगणाऱ्या नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे पोलिसांकडून अपेक्षीत आहे. मात्र, कसलिही चौकशी न करता निरपराध्याला थेट गुरासारखे बदडून काढणे ही पोलिसांची कसली मानसिकता, असा प्रश्न युवा व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर चंद्रपुरात उपस्थित होत आहे.रोहित बोथरा या व्यापारी युवकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्यापासून समाजमनात तिव्र असंतोष पसरला आहे. यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना चेम्बर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी म्हणाले, एखाद्याला कुण्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली तर त्याला खरच मारहाण केली जाते का, असा प्रश्न आहे. येथे तर एका निरपराध माणसाला अतिशय निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून ज्या पोलिसांनी हा गुन्हा केला त्या पोलिसांवर त्यांनी केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून कठोर कारवाई केली पाहिजे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.चेंबर आॅफ कॉमर्सचे उपाध्यक्ष, सदानंद खत्री म्हणाले, जे प्रकरण घडले, ते केवळ आता एकट्या रोहीत बोथरा या व्यापारी युवकाचे राहील नसून शहरातील सर्व व्यापारी, सामान्य नागरिकांचे झाले आहे. पोलिसांचे काम सामान्यांचे रक्षण करणे आहे. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. चंद्रपुरात मात्र उलटे घडले. ही बाब सामान्यांसाठी बरी नव्हे. अशा घटना वारंवार घडू नये, निरपराध माणसाला अशा पद्धतीने अमाणूषपणे मारहाण केली जाऊ नये, यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.उपाध्यक्ष रामकिशोर सारडा म्हणाले, पोलिसांच्या हातून अतिशय चुकीचे काम घडले आहे. शहरात दारूबंदीच्या नावावर काय सुरू आहे, ते साऱ्यांनाच ठाऊक आहे. त्यामुळे एखाद्या निरपराधाला पकडून तू दारू तस्करी करतो आहे, असा ठपका ठेऊन त्याला मारहाण करणे, ही बाब निश्चितच कायद्यात बसणारी नाही. त्यामुळे या प्रकरणात समाधानकारक कारवाई अपेक्षित आहे.उपाध्यक्ष विनोद बजाज म्हणाले, एखाद्याला संशयित म्हणून पकडल्यानंतर खरे तर त्याला विचारपूस करणे गरजेचे होते. मात्र संबंधिताला त्याची बाजू मांडू देण्याची कोणतीही संधी न देता त्याला एखाद्या गुन्हेगारासाठी मारहाण करणे, हे कितपत संयुक्तिक आहे. या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास करून कठोर कारवाई व्हायला हवी.व्यापारी मंडळाचे अध्यक्ष संतोष चिल्लरवार म्हणाले, एखाद्या असहाय्य सामान्य माणसाला पोलिसांनी किती मारावे, याची काही मर्यादा असावी की नाही. पोलिसांनी जे केले ते अतिशय चुकीचे आणि सामान्यांना संताप आणणारे आहे. विविध संघटनांचा निषेध मोर्चाकोणताही अपराध नसताना रोहीतला पोलिसांकडून मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी विविध संघटनांच्या सहभागात मोर्चा काढण्यात आला. मोर्चात माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, गुजराती समाज, चंद्रपूर सर्कल बिल्डर, पूज्य सिंघी पंचायत, फुटवेअर असोसिएशन, वर्धमान स्थानक समाज, झेरॉक्स संघटना, आर्य वैश्य संघटना, ट्रान्सपोर्ट असोसिएशन, चंद्रपूर कपडा असोसिएशन, रेडिमेड होजिअरी, पंजाबी सेवा समिती, माहेश्वरी सेवा समिती, प्लायवूड असोसिएशन, कोल असोसिएशन, चंद्रपूर बचाव सेवा समिती आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांना निवेदन सादर केले. यावेळी चंद्रपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, सदानंद खत्री, रामजीवन परमार, दामोदर मंत्री, रामकिशोर सारडा, हरिष गिडवाणी, घनश्याम दरबार, कुक्कू साहनी, रमेश बोथरा, विनोद बजाज, रामू तिवारी, मुन्ना भंडारी, सत्यम सोनी, चंद्रपूर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष संतोष चिल्लरवार, जितू चोरडीया, नरपत भंडारी, गोविंद सारडा, मुन्ना चांडक, जितेंद्र जोगड, श्रीचंद हसानी, राजेश पटेल, शिवन हासानी, प्रशांत बैद, दिनेश बजाज, अमर गांधी, महेंद्र मडलेचा, राजेंद्र लोढा, पिंटू मंत्री, देवेंद्र मांडवीया, राजेश डागा, सुनिल कारिया, संदीप माहेश्वरी, अमित नथवानी, नितीन पुगलिया, विवेक जैन यांच्यासह शेकडो व्यापारी सहभागी झाले होते.