शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्याला काय मिळाले

By admin | Updated: March 19, 2017 00:35 IST

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक जाणीव जपत चंद्रपूरच्या दीक्षा भूमीसाठी भरीव तरतूद केली आहे.

चंद्रपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक जाणीव जपत चंद्रपूरच्या दीक्षा भूमीसाठी भरीव तरतूद केली आहे. याशिवाय चंद्रपुरात सैनिकी स्कूल, न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, वन अकादमी संकुल, शहराला सीसीटीव्हीचे संरक्षण आणि विमानतळाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.चंद्र्रपूरचे पालकमंत्री असणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पात जिल्हयाला आणखी काय मिळणार याबाबत नागरिकांना उत्सुकता होती. जनतेने आज टिव्हीवर हा अर्थसंकल्प बघितला. या अर्थसंकल्पात देखील जिल्हयात सुरू असलेल्या विकास कामांना अधिक गतीशील करणारे काही निर्णय झाले. चंद्रपूरकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यात विकासाभिमुख सरकार स्थापन झाल्यानंतरचा हा सलग तिसरा अर्थसंकल्प सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. शेतकरी ते वारकरी यांच्या संदर्भात अत्यंत कणव ठेवून त्यांनी अर्थसंकल्पात तरतूदी केल्याच्या प्रतिक्रीया आज शहरात उमटल्या. विदभार्तील शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने कृषी पंपातील अनुशेष दुर करण्यासाठी चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा व गडचिरोली जिल्हयासह राज्यासाठी ९७९ कोटी १० लाख एवढ्या निधीची तरतूद केली आहे. प्रत्येक योजनेमध्ये चंद्रपूर जिल्ह्याला सहभागी करतानाच काही विशेष निर्णयही जिल्ह्यासाठी घेतले गेले आहेत. त्यांपैकी चंद्रपूर येथील सैनिक शाळेचा एक निर्णय आहे. सातारा येथील सैनिकी शाळेच्या धर्तीवर चंद्रपूर येथे दोनशे कोटी रुपए शाळा उभारण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. वडसा- देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मागार्साठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सोबत हवाई वाहतूकीमध्ये चंद्रपूर विमानतळाच्या पायाभूत सुविधा बळकटी करणाला प्राधान्य देत कोटयावधीची तरतूद केली आहे. यामध्ये पुनर्वसनाच्या संदर्भातही भरीव तरतूद आहे.वनमंत्री म्हणून वृक्षलागवडीला लिमका बुक आॅफ रेकार्डमध्ये घेऊन जाणारे मुनगंटीवार अर्थसंल्पातही या मुदयावर ठाम राहीले. वृक्ष लागवडीचा त्यांनी संकल्प यावेळी ही ठेवला आहे. सोबतच वनाशेजारील गावकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर गॅस सिलेंडर वाटप करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात केला आहे. याचा मोठया प्रमाणात फायदा चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण भागातील जनतेला होणार आहे. जंगलात लागणाऱ्या वणव्याला नियंत्रित करण्यासाठी चंद्रपूर वन अकादमी संकुल परिसरात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात धडक कृती दल केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी पाच कोटीची तरतूद करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा चंद्रपूर शहराशी असणारा भावनिक जिव्हाळा लक्षात घेता, चंद्रपूर येथील दीक्षाभूमीवर भवन उभारण्याचा निर्णयही या अर्थसंकल्पात त्यांनी जाहीर केला. हे स्मारक भव्य बांधले जाणार असून त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे चंद्रपुरकरातील बौद्ध बांधवाना आनंद झाला आहे. चंद्रपूर शहराची सुरक्षितेलाही या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. शहर सुरक्षित राहावे यासाठी संपूर्ण महानगरात सीसीटीव्ही प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.गुन्हे सिध्दीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढवून राज्य सरकारने गुन्हेगारीवर अंकुश लावाला आहे. विदर्भात आता चंद्रपूरात न्यायवैज्ञानिक लघु प्रयोग शाळा सुरु करण्याची घोषणा, त्याचबरोबर बेरोजगारांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. अशा घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.(नगर प्रतिनिधी)