शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानित आश्रम शाळांवरच वक्रदृष्टी का?

By admin | Updated: July 13, 2016 02:05 IST

समाजातील प्रत्येक घटक शिकला पाहिजे, या उदात्त हेतुने शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाची गंगा संपूर्ण भारतभर आणली.

इतर शाळांकडे डोळेझाक : शासनाचे धोरण भेदभाव करणारे पेंढरी (कोके) : समाजातील प्रत्येक घटक शिकला पाहिजे, या उदात्त हेतुने शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाची गंगा संपूर्ण भारतभर आणली. ही बाब स्वागर्ताह आहे. मग शासनाला अनुदानित आश्रम शाळा बंद करुन साधायचं तरी काय? शासनाची सदर शाळेवरच वक्रदृष्टी का, असा प्रश्न विचारवंताना पडला आहे. प्रत्येक क्षेत्रातील आदिवासी, अल्पसंख्याक विमुक्त जाती- भटक्या जमाती, बहुजन, अनुसूचित जाती व इतर समाजातील विद्यार्थी घटक शिकला पाहिजे, शिकला तो टिकला. या स्पर्धेच्या युगात प्रत्येक घटक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी शासन सर्वस्तरावर धडपडतो आहे. मग आदिवासी, समाजकल्याण विभागाच्या आश्रम शाळा बंद करुन सदर जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे नव्हे काय, आधीच शासनाने आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व इतर योजना बंद करुन आदिवासी विद्यार्थ्यांना उपेक्षित ठेवले आहे. यावर्षी शासनाने राज्यातील ७२ आदिवासी आश्रम (अनुदानित) शाळा बंद करून आदिवासी समाजाला धक्का दिला. त्यानंतर १ एप्रिल व ८ जून २०१६ अनुक्रमे समाजकल्याण व आदिवासी विभागाने चुकीचा ‘काम नाही, वेतना नाही’ (नो वर्क नो पेमेन्ट) चा जीआर काढून अतिरिक्त ठरलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन बंद केले. जोपर्यंत मान्यता गेलेल्या अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे शासन समायोजन करीत नाही, तोपर्यंत त्यांचे वेतन बंदच राहणार आहे. मग सदर कर्मचारी व त्यांचे कुटुंब माती खाऊन जगणार काय, हा नियम जिल्हा परिषद प्राथमिक, खासगीे माध्यमिक, शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना का लागू नाही, अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन इतरत्र होईपर्यंत त्यांना वेतन का देते, इतर शाळेकडे व कर्मचाऱ्यांकडे शासन डोळेझाक का करतो, असा आरोप शिक्षक संघाने केला आहे. शासनाने चुकीचा जीआर त्वरीत रद्द करावा अन्यथा शिक्षक संघटना आंदोलन करून उपोषणाला बसेल असा इशारा, कर्मचारी संघटनेने दिला आहे. (वार्ताहर)