शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलिचा सिव्हील विभाग ठेकेदारावर मेहरबान

By admin | Updated: July 30, 2016 01:37 IST

वेकोलि वणी क्षेत्राच्या विविध कोळसा खाण क्षेत्रातील मान्सूनच्या कामाचे अवार्ड व वर्कआर्डरनंतर पीएसडी

चौकशी व्हावी : पीएसडी, आयएसडी जमा न करताच कामे पूर्णत्वाकडे घुग्घुस: वेकोलि वणी क्षेत्राच्या विविध कोळसा खाण क्षेत्रातील मान्सूनच्या कामाचे अवार्ड व वर्कआर्डरनंतर पीएसडी आणि आयएसडी (सिक्युरीटी डिपाझिट) रक्कम ठेकेदाराकडून जमा न करता काम पूर्ण करण्याचा प्रकार सर्व कोळसा खाणीच्या सिव्हील विभागाकडून सुरु आहे. यातून वेकोलिचा सिव्हील विभाग ठेकेदारांवर मेहरबान असल्याचे दिसून येत आहे. वेकोलि वणी क्षेत्रातील सिव्हील विभागाकडून मागील अनेक दिवसांपासून बराच गोंधळ सुरु आहे. पैनगंगा कोळसा खाणीत घडलेला प्रकार वृत्तपत्रातून समोर आल्याने बरेच गैरप्रकार आता चर्चेत येत आहे. त्या श्रृंखलेतून ठेकेदाराला त्या विभागाकडून अभय दिले जात आहे. वणी क्षेत्रात घुग्घुस, नायगाव, निलजई, मुंगोली, वैनगंगा, कोलगाव कोळसा खाणी आहेत. या क्षेत्रात मान्सूनची कामे दोन महिन्यांपूर्वी कामाचे अवार्ड झाले. वर्कआर्डर निघाले. ज्या ठेकेदारांना अवार्ड मिळाले, त्यांनी कामाची सुरुवात केली. ही कामे आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. मात्र पीएसडी रक्कम ठेकेदाराकडून जमा न करता कामे करण्यात आली. नियमानुसार कामाचे अवार्ड झाल्यानंतर २८ दिवसांच्या आत ठेकेदाराला पीएसडी रक्कम जमा करावी लागते. मात्र कामे सुरु होऊन दोन महिने उलटले तरी ठेकेदारांनी रक्कमच सिव्हील विभागात जमा केली नाही. सिव्हील विभागाचे प्रमुख अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करुन प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ठेकेदारांना सहकार्य करीत असल्याचे चित्र समोर येत आहे. (वार्ताहर)