शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भले शाब्बास! वाघाच्या जबड्यातून मुलाने केली वडिलांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2021 20:20 IST

Chandrapur News चिंतलधाबा बिटातील शेतशिवार नजीक पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढविला. मात्र बाजूलाच असलेला त्यांचा मुलगा धनराज वडिलांना वाघाच्या जबड्यातून सोडविण्यासाठी चक्क वाघाशी दोन हात करायला पुढे आला.

ठळक मुद्देशेतकरी गंभीर जखमीवाघाने हल्ला चढविताच मुलगा कुऱ्हाड घेऊन वाघावर चालून गेला

पी.एच. गोरंतवारचंद्रपूर : पोंभूर्णा वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या चिंतलधाबा बिटातील शेतशिवार नजीक पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला चढविला. मात्र बाजूलाच असलेला त्यांचा मुलगा धनराज वडिलांना वाघाच्या जबड्यातून सोडविण्यासाठी चक्क वाघाशी दोन हात करायला पुढे आला. कुऱ्हाड घेऊन वाघावर चालून गेला. अखेर वाघ पळून गेल्याने वडिलांची वाघाच्या तावडीतून सुटका केली. ही थरारक घटना गुरुवारी घडली.चिंतलधाबा बिटातील कक्ष क्रमांक ९७ वनक्षेत्रातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतात बसून गजानन शिवराम मोरे (५५) रा. चिंतलधाबा हे शेतात गुरे चारत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. बाजूलाच बकऱ्या चराई करीत असलेल्या धनराजने वडिलांवर वाघाने हल्ला केल्याचे दिसले. क्षणात तो हातात कुऱ्हाड घेऊन वाघाजवळ धावत गेला. आरडाओरड करून व भीती दाखवून वाघाला पळवून लावले. मोठ्या हिमतीने मुलाने बापाला वाघाच्या जबड्यातून वाचविले.

घटनेची माहिती मिळताच गावकरी, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमीला तत्काळ पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र गंभीर जखम असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना तत्काळ चंद्रपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, वनक्षेत्र अधिकारी आनंद कोसरे,चिंतलधाबा बिट वनरक्षक राजेंद्र मेश्राम, केमारा बिट वनरक्षक शीतल कुळमेथे, वनमजूर माणिक आत्राम, किशोर धोडरे, संजू जंबुलवार, सरपंच शुभांगी कुत्तरमारे,वन समिती अध्यक्ष देवराव भांडेकर, भुजंग पेंदोर घटनास्थळी उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघ