शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे जंगलात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:42 IST

आवळगाव-मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातील २० गावात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत तिघांना वाघाने ठार केले. मात्र, वनविभागाने पिंजरे लावण्यापलिकडे काहीच केले नाही.

ठळक मुद्देवांद्रा फाट्यावर धरणे : महिलांची लक्षणीय उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : आवळगाव-मुडझा जिल्हा परिषद क्षेत्रातील २० गावात गेल्या काही महिन्यांपासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. आतापर्यंत तिघांना वाघाने ठार केले. मात्र, वनविभागाने पिंजरे लावण्यापलिकडे काहीच केले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी वांद्रा फाट्याजवळ असलेल्या जंगलात धरणे आंदोलन केले. २० गावातील नागरिक यात सहभागी झाले. त्यात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.बरडकिन्ही, चिचगाव, डोर्ली, वांद्रा, आक्सापूर, पवनपार, बेलगाव, मूरपार, कळमगाव, सायगाव, कोसंबी, भूज, पद्मापूर, आवळगाव, हळदा, बोडदा, मुडझा, बल्लारपूर या गावात गेल्या एक-दीड महिन्यापासून वाघ, बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. वांद्रा येथील जय धंदरे यांच्यावर वाघाने हल्ला करून जमखी केले. चिचगाव येथील ऐश्वर्या अलोणे हिच्या घरात शिरुन बिबट्याने हल्ला केला.देऊळगाव येथील मिथून नामक युवकही जखमी झाला होता. मूरपार येथील साहील अमोल सालोरकर या आठ वर्षीय बालकावर वाघाने हल्ला करून ठार केले. पवनपार येथील शालू डोंगरवार या महिलेवरही वाघाने हल्ला करून ठार केले. रविवारी खुशी ठाकरे या सहा वर्षीय मुलीसही वाघाने ठार केले. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. मात्र, वनविभागाने अजूनही उपाययोजना केल्या नाही. वनविभागाने धुमाकूळ घालणाºया वाघ, बिबट्याचा बंदोबस्त करावा, यासह अन्य मागण्यांना घेवून जिल्हा परिषद सदस्य राजेश कांबळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी ज्ञानेश्वर कायरकर, मोरेश्वर झोडे, रूपेश बांदोले, प्रशांत चिमूरकर, विलास विखार, मंगला लोनबले, किशोर राऊत, प्रमोद मोटघरे, छत्रपती सुरपाम यांच्यासह २० गावातील नागरिक उपस्थित होते.वाघांचा बंदोबस्त करावा, वाघ, बिबट्यांना दुसरीकडे हलवावे, वाघाची नसबंदी करावी, वाघ, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयातील सदस्यांना नोकरी द्यावी, वडधा येथील नागरिकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, या मागण्यांचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांना दिले.

टॅग्स :Tigerवाघ