शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य अर्थसंकल्पातील तरतुदींचे स्वागत आणि टीकाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:31 IST

चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा दुसरा अर्थसंकल्प सोमवारी (दि. ८) विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून काय ...

चंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा दुसरा अर्थसंकल्प सोमवारी (दि. ८) विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून काय मिळणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अर्थसंकल्पातील तरतुदींचे काहींनी स्वागत केले तर काहींनी निराशाजनक असल्याची टीका केली. उद्योग जगतातही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. कृषी, आरोग्य, महिला, सामाजिक न्याय, जिल्हा व तालुक्यासाठी नवीन योजनांची घोषणा झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवर व सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचा सूर उमटला.

सर्व समाजघटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. यातून सर्व घटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद आहे. कोरोना संकटात राज्याची महसुली तुट वाढली. केंद्रातील मोदी सरकारने असहकार्याची भूमिका घेऊनही शेतकरी, आदिवासी, महिला, दलित, इतर मागास वर्गाला अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या विकासाकडे व प्रगतीकडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे.

-विजय वडेट्टीवार, पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन, बहुजन कल्याण मंत्री

सर्व समुदाय विकासाच्या केंद्रस्थानी

विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी व सर्व समुदाय विकासाच्या केंद्र्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सुंदर माझे कार्यालय या योजनेतंर्गत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी ५० कोटींची तरतूद आहे. मुलींना शाळेत मोफत प्रवास, पर्यटनासाठीही भरीव तरतूद आहे.

-किशोर जोरगेवार, आमदार चंद्रपूर

जिल्हा वार्षिक निधी कपात अन्यायकारक

महाराष्ट्र हे कर्जात बुडालेले राज्य असल्याचे अर्थसंकल्पातून

पुढे आले. जिल्हा निधीत ६७ टक्के कपात अन्यायकारक आहे. विदर्भाचा अनुशेष कधीच भरणार नाही. नियमित कर्ज भरणाºया शेतकऱ्यांच्या परताव्याची सोय नाही.

-अ‍ॅड. वामनराव चटप, माजी आमदार, राजुरा

नवी दिशा देणारा अर्थसंकल्प

कोरोना काळात महाराष्ट्राला नवी दिशा देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पातून सर्व घटकांना न्याय दिला. जिल्हा व तालुका योजनांसाठी महत्त्वाच्या तरतुुदी आहेत. तुटीचा अर्थसंकल्प असूनही सामान्यांचे हित साधणारा आहे.

-डॉ. अशोक जीवतोडे, राष्ट्रीय समन्वयक, ओबीसी महासंघ

लघु उद्योगांसाठी तुटपुंजी तरतूद

कोरोनामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील लघु उद्योगांची स्थिती वाईट झाली. सरकारने निधीची घोषणा केली. पण, ती तुटपुंजी आहे. त्यामुळे सरकारने चंद्रपूरसारख्या मागास जिल्ह्यासाठी विशेष पॅकेज द्यावा.

-मधुसूदन रुंगठा, अध्यक्ष चंद्रपूर एमआयडीसी, चंद्रपूर

केवळ घोषणा नको, अंमलबजावणी हवी

महिलांसाठी गृहस्वामिनी योजना, महिलेच्या नावे घराची नोंदणी, मुद्रांक शुल्क सवलत, जिल्हा व शासकीय रुग्णालयात मानसोपचार केंद्र स्थापनेची घोषणा झाली. पण, केवळ घोषणा नको तर प्रभावी अंमलबजावणी हवी.

-डॉ. अभिलाषा गावतुरे, सामाजिक कार्यकर्त्या, चंद्रपूर

गोसेखुर्दसाठी एक हजार कोटी तरतूद

शेतकऱ्यांना ३ लाखांचे शून्य टक्के व्याजाने कर्ज, कृषिपंप जोडणी योजना राबविण्यासाठी दीड हजार कोटी निधी व गोसेखुर्द प्रकल्पासाठी एक हजार कोटी तरतूद करून डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. शेतकरी हितासाठी हे काम पूर्ण झाले पाहिजे.

-विवेक धारणे, सिंचन अभ्यासक, चंद्रपूर