शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडीवरून निघाली लग्नाची वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 23:28 IST

विज्ञानाने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञाने व्यापले आहे. त्यामुळे काळानुसार विवाह पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्न खर्चात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देरामपूर ते राजुरा : ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा अनोखा सोहळा

प्रकाश काळे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : विज्ञानाने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात क्रांती केली आहे. प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञाने व्यापले आहे. त्यामुळे काळानुसार विवाह पद्धतीतही आमुलाग्र बदल झाला आहे. हायटेक विवाह सोहळ्यामुळे लग्न खर्चात वाढ झाली आहे. मात्र राजुरा तालुक्यातील रामपूर येथील उध्दवराव चाफले यांनी आपला मुलगा गौरवची नवरदेवाची वरात चक्क बैलबंडीवरून काढल्याने या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पारंपरिक विवाह सोहळ्याचे दर्शन झाले. रामपूर ते राजुरा अशा या वरातीची परिसरात चांगलीच चर्चा झाली.सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. रखरखते उन्ह अंगावर झेलत विवाह सोहळे मोठ्या गाजावाजात पार पडत आहे. लग्न म्हटले तर तीन - चार लाख रुपये सहज खर्च होतात. त्यात लग्नाची वरात न्यायला नवरदेवाकडून हायटेक चारचाकी वाहन सजवून वरात वाजतगाजत काढली जाते. मात्र आधुनिक परंपरेला फाटा देत रामपूर येथे उध्दवराव चाफले यांनी आपला मुलगा गौरवची वरात चक्क बैलबंडी, रेंगीतून काढली.त्यामुळे हा विवाह सोहळा राजुरा शहरात व परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.लग्नसोहळ्यात काळानुरूप झालेले बदल, यामुळे लग्नाचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. मात्र रामपूर येथील गौरवचा लग्नसोहळा याला अपवाद ठरला आहे.बैलबंडी, रेंगी, सनईचा सप्तर्षी सूर असा लग्नसोहळ्याचा थाट पाहून वरात पाहणारे क्षणभर थांबायचे. मोबाईलच्या कॅमेराने बैलबंडीची ही वरात प्रत्येकजण टिपून घेत होता. ही वरात जेव्हा रामपूर येथून राजुरा शहरात पोहोचली, तेव्हा रस्त्याने जाणारे सर्वच जण अवाक झाले आणि कधी बैलबंडी, रेंगीची लग्न वरात न बघणाऱ्यांनी या विवाहसोहळ्यांची वरात कुतुहलाने बघून घेतली. या वरातीचे छायाचित्र सोशल मीडियावर वायरल झाल्याने या विवाह सोहळ्याची दिवसभर राजुरा शहरात व परिसरात चर्चा सुरू राहिली.लग्नसोहळा ठरला आदर्शलग्नसोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. महागड्या गाड्या, डेकोरेशन, डीजेच्या तालावर नाचणारे वºहाडी, असे सर्वसाधारण चित्र वरातीत दिसते. या साºया आधुनिक पद्धतीला बगल देत अत्यंत साध्या पद्धतीने रामपूर येथील उध्दव चाफले यांनी आयोजित केलेला हा विवाह सोहळा अनेकांसाठी आदर्श ठरला आहे.