शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

वेकोलित कामगारांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर!

By admin | Updated: March 20, 2015 01:08 IST

वेस्टर्न कोल फिल्ड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलि गोवरी उपक्षेत्रात सुरक्षेअभावी कामगारांचा जीव धोक्यात आला आहे.

गोवरी : वेस्टर्न कोल फिल्ड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वेकोलि गोवरी उपक्षेत्रात सुरक्षेअभावी कामगारांचा जीव धोक्यात आला आहे. वेकोलि प्रशासन सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवून कामगारांकडून काम करवून घेत असल्याने वेकोलित कामगारांच्या अपघातात वाढ झाली आहे.बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. या कोळसा खाणीत कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही सुविधा पुरविण्यात येत नाही. याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. मागील आठवड्यात डोजर सेक्शनमध्ये डोजर दुरुस्तीचे काम करताना शंकर आगलावे या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वेकोलितील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वेकोलि कामगारांना सुरक्षेच्या कोणत्याही सोयीसुविधा पुरवित नाही. त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. वेकोलित अनेक मशीन जुन्या आहेत. त्या मशीनची काम करण्याची क्षमता नसताना अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसार काम करावे लागत आहे. अनेक जुन्या मशीनच्या कॅबीन खराब झाल्या आहेत. माती, कोळसा टाकणारे डम्पर अखेरच्या घटका मोजत आहे. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमावणाऱ्या वेकोलित कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.याकडे वेकोलिचे जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे दिवसेंदिवस कामगारांच्या अपघातात वाढ झाली असून वेकोलित कामगारांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. (वार्ताहर)