शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:51 IST

चिमूर नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागात पाणी टंचाई नित्याचीच बाब झाली. यावर उपाययोजनेकरिता मासिक सभेत निर्णय होऊनही प्रशासनाने अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरसेवकांनी रविवारपासून उपोषण सुरू केले.

ठळक मुद्देसभापतींचे आश्वासन : नगरसेवकांचे उपोषण सुटले

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर नगर परिषद क्षेत्रातील अनेक प्रभागात पाणी टंचाई नित्याचीच बाब झाली. यावर उपाययोजनेकरिता मासिक सभेत निर्णय होऊनही प्रशासनाने अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरसेवकांनी रविवारपासून उपोषण सुरू केले. दरम्यान, पाणी पुरवठा सभापतींनी आश्वासन दिल्याने सोमवारी उपोषणाची सांगता झाली.शहरातील पाणी पुरवठा समस्येबाबत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी,नगराध्यक्ष, पाणीपुरवठा सभापतींना नगरसेवकांनी निवेदन दिले होते. मात्र यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने नगरसेवकांनी उपोषण सुरू केले. नगर परिषद स्थापनेनंतरही नागरिकांच्या गरजा पूर्ण होत नाही. असा आरोप करून नगरसेवकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले. शहरात पाणी टंचाई असताना कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे नागरिकांचा नगरसेवकांवर रोष आहे. पाणी टंचाई तसेच कुपनलिका कायान्वित करावी यासाठी शुक्रवारी निवेदन दिले. रविवारपर्यंत समस्या सोडविली नाही तर सोमवारी नगरपरिषद कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र प्रशासन व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यात अपयश आल्याचा ठपका ठेऊन नगरपरिषद कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता उपोषणाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, पाणी पुरवठा सभापती उषा हिवरकर यांनी नगरसेवक काँग्रेस गटनेता अ. कदीर शेख, विनोद ढाकुणकर , उमेश हिंगे, गोपाल झाडे, अ‍ॅड. अरूण दुधनकर यांच्यशी चर्चा करून दोन दिवसांत उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता करण्यात आली.