शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षित समाजालाही सत्तेत प्रतिनिधित्व मिळवून देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 22:40 IST

मागील ७० वर्षांच्या काळापासून सत्तेपासून उपेक्षित असलेल्या अन्यायग्रस्त समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व वंचित बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : वंचित बहुजन समाजाचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : मागील ७० वर्षांच्या काळापासून सत्तेपासून उपेक्षित असलेल्या अन्यायग्रस्त समाजाला सत्तेत प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व वंचित बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. आगामी निवडणुकात वंचित बहुजन समाजाला भूलथापा देणाऱ्या राजकीय पक्षांना सत्तेतून उलथून टाकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती करण्यात आली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.चिमूर येथील बी.पी.एड.कॉलेज मैदानात आयोजित धनगर, माना, हलबा, ढिवर समाजाच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर धनगर समाजाचे नेते आमदारहरिभाऊ भदे, माना समाजाचे नेते माजी राज्यमंत्री डॉ. रामेशकुमार गजभे, मच्छीमार संघर्ष समितीचे संयोजक माजी न्या. चंद्रलाल मेश्राम, आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष कैलास राऊत, धनराज वंजारी, भारिपचे राज्य महासचिव कुशल मेश्राम, जिल्हा अध्यक्ष जयदीप खोब्रागडे ,के एल नान्हे, अनमोल शेंडे, मेळाव्याचे संयोजक अरविंद सांदेकर उपस्थित होते. पुढे बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भाजप सरकार समाजा-समाजात तेढ निर्माण करून सत्तेत येण्याच्या प्रयत्न करीत असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रयत्न हाणून पाडा. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वासुदेव श्रीरामे, संचालन प्रा. दिनकर चौधरी यांनी केले.