शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 05:00 IST

देशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.

ठळक मुद्देनिवृत्त जवानांच्या आठवणी : देशसेवेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार जवानांचे योगदान

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ‘आमचे काम अत्यंत अवघड होते. आम्ही जिथे कार्यरत होतो तो भाग म्हणजे हाडे गोठविणारा थंड प्रदेश. डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण केले. शत्रूकडून गोळ्यांचा वर्षाव झाला तरी ठाणे सोडले नाही. आपला सहकारी शहीद झाल्याचे दु:ख मनात दडवून शत्रुवर चाल करणे हेच आमचे जीवनध्येय’ हे निवृत्त जवानांचे प्रतिनिधिनिक मनोगत ऐकले की ‘आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची’ या ओळीची स्वातंत्र्यदिनी आठवण पुढे येते.भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांना अखेरचा इशारा देण्यासाठी महात्मा गांधीजींनी ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ हा नारा दिला. जनमानसाची पकड घेणाऱ्या या नाऱ्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही पडले. देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यातून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासोबतच स्वातंत्र्यानंतर देशसेवा करणाऱ्या जवानांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञ असणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्ंह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची इतिहासाने नोंदही घेतली आहे. देशसेवा करून जिल्ह्यातील १ हजार १८८ जवान निवृत्तीचे जीवन जगत आहेत. आतापर्यंत सुमारे अडिच हजारहून जास्त भूमिपूत्रांनी देशसेवा केली. देशसेवेत अमुल्य योगदान देणारे सुभेदार शंकर नेंगरे हे शौर्यचक्र पुरस्काराचे मानकरी आहेत.जिल्ह्यात दिवंगत सैनिकांच्या पत्नींची संख्या ३२७ आहे. सैन्य दलातील जवानांच्या दोन वीरमाताही आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली.सेवारत जवानांची व्हावी नोंददेशसेवेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या निवृत्त जवानांची नोंद जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात केली जाते. मात्र, देशाच्या सीमेवर सध्या कार्यरत असणाऱ्या सैनिकांची नेमकी संख्या किती याबाबत जिल्हा प्रशासनाकडे नोंद नाही. जिल्हाधिकारी कार्यालय फक्त स्वातंत्र्यसैनिकांची नावे व त्यांच्यावरी अवलंबित निवृत्तीधारकांच्या नावांची नोंद आहे. शिवाय केंद्र व राज्य शासनाकडून सन्मानधन स्वीकारणाऱ्या १७ अवलंबित निवृत्तीधारकांचीही नोंदणी आढळली.भारतीय सैन्यात वाढावा जिल्ह्याचा टक्कासैन्यातून कर्तव्य बजावून निवृत्त झालेल्या जवानांची संख्या १ हजार १८८ आहे. युवक-युवतींनी सैन्यात जावे, यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून प्रोत्साहन दिले जाते. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त कॅप्टन दीपक लिमसे सातत्याने प्रयत्नरत आहेत. मात्र, जिल्ह्यातील युवक-युवतींचा सैन्य दलातील टक्का वाढला नाही.निवृत्त सैनिकांच्या हितासाठी विविध योजना राबविल्या जातात. शिवाय, युवक-युवतींनी सैन्यदलात जावून देशसेवा करावी, याकरिताही मार्गदर्शन केले जाते. जिल्ह्यातील कार्यरत जवानांची नोंद या कार्यालयात होत नाही.- दिनेशकुमार गोवारे,जनमाहिती अधिकारीजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन