शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्विनी प्रकल्प गुंडाळण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 3, 2015 00:47 IST

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाचा ...

४० सहयोगिनींवर गंडांतर : शासनाने लक्ष द्यावेचंद्रपूर : राज्याच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाचा ‘तेजस्विनी’ प्रकल्प निधीअभावी गुंडाळण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पात काम करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ४० तर विदर्भातील ४०० सहयोगिनींवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे महिलांच्या बचत गटाच्या बळकटीकरणाकरिता तेजस्विनी हा प्रकल्प २००७ या वर्षीपासून राज्यात चालविला जात आहे. आठ वर्षांसाठी हा प्रकल्प होता. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात सहयोगिनींची ११ महिन्याच्या करारतत्त्वावर नियुक्ती करण्यात आली. सात वर्षापासून राज्यात १४००, विदर्भात ४०० तर जिल्ह्यात ४० महिला, युवती या प्रकल्पात काम करीत आहे. २०१५ मध्ये प्रकल्पाची मुदत संपल्याने हा प्रकल्पच गुंडाळण्याच्या हालचाली शासनपातळीवर सुरू आहेत. विशेष म्हणजे निधी नसल्याचे कारण महिला आर्थिक विकास महामंडळाने पुढे केले आहे. परंतु, मागील सात वर्षांपासून या प्रकल्पात काम करणाऱ्या सहयोगिनींचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच महिला आर्थिक विकास महामंडळ नवी जाहिरात काढून काही जागा भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. त्यामुळे जुन्या सहयोगिनी काढून नव्यांना संधी मिळणार असल्याने सात वर्षांपासून प्रकल्पात काम करणाऱ्या सहयोगिनींमध्ये रोष निर्माण झाला आहे. यातील अनेक सहयोगिनी विवाहित असून त्यांच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो, अशा परिस्थितीत त्यांना कामावरुन काढले तर त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे जुन्या सहयोगिनींनाच प्रकल्पात सामावून घ्यावे अन्यथा ग्रामीण जीवनोन्नती अभियानात सहयोगिनींची नियुक्ती करुन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी सहयोगिनींनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)बसस्थानक परिसरात दुर्गंधीचे वातावरणवरोरा : येथील बसस्थानक तालुक्यातील प्रवाशांसाठी महत्वाचे ठिकाण आहे. हे स्थानक सध्या घाणीच्या विळख्यात सापडले आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असून स्वच्छतागृहातही घाणीचे साम्राज्य आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी वारंवार होत आहे.या बसस्थानकावर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)