शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंधाराच्या वाटेवर तारुण्याला जपणे ही अग्निपरीक्षाच !

By admin | Updated: January 3, 2015 22:59 IST

‘अंधाऱ्या वाटेवरुन प्रवास करताना प्रवासात येणाऱ्या तारुण्याला विकृत समाजापासून जपणे ही एक अग्निपरीक्षाच असते. परंतु अत्यंत गरीब समाजात जन्माला आलेल्या दृष्टिहीन मुलीला शिक्षण

राधा बोरडे : जीवन गौरव पुरस्काराने सन्मानितचंद्रपूर : ‘अंधाऱ्या वाटेवरुन प्रवास करताना प्रवासात येणाऱ्या तारुण्याला विकृत समाजापासून जपणे ही एक अग्निपरीक्षाच असते. परंतु अत्यंत गरीब समाजात जन्माला आलेल्या दृष्टिहीन मुलीला शिक्षण घेवून उच्चविद्याविभूषित होणे ही त्यापेक्षाही महाभयंकर बाब आहे’ असे मनोगत अंधत्वाचा शाप घेवून जन्माला आलेल्या आणि तरीही जीवनप्रवासाबाबत सकारात्मक भूमिका बाळगणाऱ्या राधा इटणकर बोरडे यांनी व्यक्त केले. नवरगाव येथील स्व. बालाजी पाटील बोरकर स्मृती प्रतिष्ठानद्वारा भारतीय शिक्षण संस्था नवरगावच्यावतीने आयोजित स्मृती सोहळ्यादरम्यान राधा ईटनकर बोरडे यांना डॉ.तेजराम बुद्धे यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला पत्रकार सुनील कुहीकर, प्रा.सदानंद बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. पाच हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. राधा यांच्या नेत्रहीन आयुष्याचा संघर्ष समाजातील प्रत्येक डोळस व्यक्तीला लाजवणारा आणि प्रेरणादायी आहे. वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी रंगीबेरंगी जग बघण्याचा राधाचा अधिकार नियतीने हिरावला. स्वत:च्या मर्यादांचा बाऊ न करता प्रवाहाविरोधी संघर्षालाच त्यांनी आपलं जीवन बनविलं. विद्यापीठातून मराठी विषयामध्ये गुणानुक्रमे द्वितीय आलेल्या राधाने समाजाला खऱ्या अर्थाने डोळस करण्याच्या सामाजिक हेतूने नागपूरच्या मानेवाडा भागात ‘लुईराम’ वाचनालयाची निर्मिती केली. त्यांच्या ह्या प्रवाहाविरोधी प्रवासाबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मागील वर्षी हा ुपुरस्कार विदर्भाच्या बहीनाबाई अंजनाबाई खुणे यांना देण्यात आला. आपल्या कर्तृत्वाने अजोड कामगिरी करणाऱ्या मात्र प्रसिद्धीपासून उपेक्षित असलेल्या कला, क्रीडा आणि साहित्यात भरीव कामगिरी करणाऱ्या महानुभावांना हा पुरस्कार दिला जातो. (प्रतिनिधी)