शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
2
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
3
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
4
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
5
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
6
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
7
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
8
Diwali Muhurat Trading 2025 : शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
9
Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
10
IRCTC Website Down: आयआरसीटीसीची तिकीट बुकिंग साईट झाली ठप्प! मोबाईल अ‍ॅपवरुनही बुकिंग होईना
11
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
12
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?
13
वयाच्या २५ व्या वर्षी ऑलिंपिक चॅम्पियननं घेतला संन्यास; एरियार्नच्या निर्णयानं चाहते हैराण
14
दिवाळीत शनि प्रदोष: शंकराची पूजा देईल पुण्य-लाभ, ‘असे’ करा व्रत; प्रभावी मंत्रांचे जप कराच
15
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
16
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
17
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
18
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
19
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
20
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?

चंद्रपूर मनपाद्वारे इरई धरणातील पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: April 18, 2017 00:49 IST

इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत.

जलवाहिनीला गळती : दुरूस्तीकडे डोळझाकदुर्गापूर : इरई धरणातून महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागल्या आहेत. या गळत्या कित्येक वर्षांपासून तशाच कायम असल्याने अर्ध्याअधिक पाण्याचा अपव्यय होत आहे. परंतु त्या दुरूस्त करण्याकडे मनपाने डोळेझाक चालविली आहे.वीज निर्मितीकरिता चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने खास धरणाचे बांधकाम केले आहे. यातूनच मनपा चंद्रपूर शहरासाठी पाण्याची उचल करीत असते. याकरिता इरई धरणापासून तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १२०० एम.एम. ची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. हे पाणी ११० हार्स पॉवरच्या दोन पंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचविले जाते. प्रचंड गतीने पाणी जात असताना धरणाजवळच असलेल्या वीज केंद्राच्या फ्लो मीटर रूमपासून किटाळी गावापर्यंत कित्येक वर्षांपासून ठिकठिकाणी पाण्याखाली गळत्या ‘जैसे थे’च आहेत. त्या गळत्या तरोली गवताने झाकल्या गेल्या आहेत. एवढ्या भागात जिकडेतिकडे पाणी साचलेले दिसून येते. त्यानंतर कोयना गेट ते खत्री कॉलेजपर्यंतही गळत्या असून एअर व्हॉल्हही आहेत. त्या गळत्यांमधून आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात पाणी वाहून जात आहे.प्रत्येक जलवाहिनीवर धरणाजवळ धरणातून निघणारे पाणी व प्रत्यक्ष वीज केंद्रात पोहोचणारे पाण्याचे मोजमाप करणारे फ्लो मीटर बसविलेले आहेत. हे मीटर मनपाने बसविलेले आहेत. सध्या धरणातील पाण्याची पातळी २०५.३२५ मीटर असून त्यात ८६.३५ दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे ५४ टक्के पाणी धरणात अद्यापही शिल्लक आहे. मात्र गळत्या, पाण्याचा अपव्यय व बाष्पिभवनामुळे दिवसागणिक पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गळत्यामधून २४ तास सतत पाणी वाहून जात असल्याने धरणातील जलसाठ्याला जबर फटका बसत आहे. गेल्या पावसाळ्यात धरण तुडूंब भरले होते. त्यामुळे यंदा एवढा जलसाठा शिल्लक आहे. २०१० मध्ये पाऊस न आल्याने धरणाची छोट्या तळ्यासारखी अवस्था झाली होती. त्या भीषण संकटाचा महानगरपालिकेला विसर पडला आहे. (वार्ताहर)