शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तपाळ योजनेचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: February 26, 2016 01:03 IST

तपाळ पाणी पुरवठा योजनेच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने नागभीडसह ११ गावांना या योजनेमार्फत होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे.

घनश्याम नवघडे नागभीडतपाळ पाणी पुरवठा योजनेच्या कामगारांनी काम बंद आंदोलन सुरु केल्याने नागभीडसह ११ गावांना या योजनेमार्फत होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. परिणामी या गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल सुरु झाले आहेत.नागभीड, नवखळा, चिखलपरसोडी, देवटेक, बाळापूर, ढोरपा, मौशी, या नागभीड तालुक्यातील आणि तोरगाव (खुर्द), तोरगाव (बुज.) बेलगाव आणि तपाळ या ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येतो. १९९९ मध्ये ही योजना कार्यान्वित करण्यात आली असून जिल्हा परिषदेकडे या योजनेची देखभाल दुरुस्तीचे काम असले तरी जिल्हा परिषदेने या कामासाठी एका कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.योजनेच्या देखभालीसाठी १३ ते १४ वर्षापासून १४ कामगार कार्यरत आहेत. या काळात अनेक कंत्राटदार बदलले असले तरी कामागार मात्र तेच आहेत. असे या कामावरील कामगारांचे म्हणणे आहे. या कामगारांना शासकीय नियमानुसार मेहनताना देण्यात यावा व हात मेहनताना बँकेमार्फत देण्यात यावा, अशी या कामगारांची असली तरी महिन्याचे साडेपाच हजार रुपयात या कामगारांची बोळवण करण्यात येत आहे आणि हा मेहनताना बँकेमार्फत जमा न करता नगदी स्वरूपात देण्यात येत आहे.कामगार ही मागणी आॅक्टोबर १५ पासून ही करीत असले तरी कामगारांच्या या मागण्या कोणीच मनावर घेतल्या नाही. त्यामुळे कामगार संतापले आणि त्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला. पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी २२ फेब्रुवारीपासून सर्व कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले. या योजनेत मुख्य आणि महत्वाची भूमिका जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची असली तरी कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष न घालता कंत्राटदाराचे हित कसे साधता येईल, याकडेच जि.प.च्या अधिकाऱ्यांचा कल असल्याचा कामगारांचा आरोप आहे.गेल्या तीन दिवसांपासून या अकरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे या अकरा गावात नागरिकांचे पाण्याविना हाल सुरु आहेत. त्यातल्या त्यात नागभीडची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. नागभीडमध्ये ४० टक्के लोकांकडे पाण्याची खासगी व्यवस्था असली तरी पिण्यासाठी मात्र १०० टक्के लोक तपाळच्याच पाण्याचा वापर करतात, हे वास्तव आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे पाणी बंद असल्याने नागभीडमध्ये लोकांचे अतिशय हाल सुरु असले संबंधितांकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही, हे विशेष.