शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरचा पाणीपुरवठा चार दिवस ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:33 IST

चंद्रपूर-मूल महामार्गाच्या बांधकामात चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन विस्कळीत झाली. यामुळे शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणीच पोहचणे बंद झाले आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. परिणामी चार दिवस चंद्रपूरकरांना नळाचे पाणी मिळणार नाही.

ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मुख्य जलवाहिनी क्षतिग्रस्त : निष्काळजीपणाचा चंद्रपूरकरांना फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर-मूल महामार्गाच्या बांधकामात चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन विस्कळीत झाली. यामुळे शहरातील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणीच पोहचणे बंद झाले आहे. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. परिणामी चार दिवस चंद्रपूरकरांना नळाचे पाणी मिळणार नाही. आधीच चंद्रपूरच्या विविध भागात कृत्रिम पाणी टंचाई असताना आता संपूर्ण शहरालाच याची झळ पोहचणार आहे.शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता घेता महापौर अंजली घोटेकर, आयुक्त संजय काकडे व परिसरातील नगरसेवकांद्वारे जलवाहिनीची पाहणी करण्यात आली असून चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे सावरकर चौक ते बंगाली कॅम्प (मूल रोड) येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरु आहे याच भागातून चंद्रपूर शहर महानगरपालिकेची तुकूम जलशुद्धीकरण केंद्र ते बाबुपेठ येथील पाणीपुरवठा करणारी ५०० एमएम व्यासाची जलवाहिनी गेली आहे. याद्वारे शहरातील बंगाली कॅम्प, बाबुपेठ, सहकार नगर, नेहरू नगर इत्यादी भागाला पाणीपुरवठा केला जातो, सोबतच केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचेही काम जलद गतीने सुरु आहे, याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला अवगत करण्यात आले असतानासुद्धा निष्काळजीपणाने खोदकाम करून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे केले जात आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे येथील रस्ता चौपदरीकरणाचे काम अहमदनगर येथील ए.सी शेख कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले असून त्यांना खोदकामाने पाणीपुरवठा खंडित होण्याच्या सूचना वारंवार देण्यात येऊन सुद्धा जलवाहिनी क्षतिग्रस्त करण्याचे काम सुरु आहे. याबाबत पाहणीदरम्यान आयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या उपस्थित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात समज दिली आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे सदर जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून महानगरपालिकेचे सहायक आयुक्त विजय देवळीकर, शहर अभियंता महेश बारई, शाखा अभियंता विजय बोरीकर, संजय जोगी पूर्ण वेळ दुरुस्ती कामावर लक्ष ठेऊन आहेत. चंद्रपूरकरांना मात्र चार दिवस पाण्यासाठी कसरत करावी लागणार आहेत.कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई होणार -अंजली घोटेकरमूल मार्गावर चंद्रपूर शहराची मुख्य पाईप आहे. ती बांधकाम करताना उघडी पडल्यानंतर तीला जेसीबीने सरकविण्यात आली. यामुळे पाईपलाईन विस्कळीत होऊन त्यातून टाकीमध्ये जाणारे पाणी बाहेर फेकल्या गेले. ही कृती मागील काही दिवसांपासून या मार्गावर सुरू असल्याचा आरोप महापौर अंजली घोटेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून सदर कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले असून जनतेला वेठीस धरणाºया कंत्राटदारावर फौजदारी कारवाईचे संकेतही महापौर घोटेकर यांनी दिले.रस्ता बांधकामाची गती ढिम्मचंद्रपूर-मूल महामार्गाच्या सिमेंट कॉक्रीटीकरणासाठी काही महिन्यांपासून रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. रस्ता खोदकाम केल्यानंतर रस्त्याच्या कडेला सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले. तोपर्यंत खोदलेल्या रस्त्यावर कोणतेही काम केले नाही. यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. खोदकाम केल्यानंतर लगेच रस्ता बांधकाम सुरू करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहेत.४५ अंश तापमानाने चंद्रपूरकर बेजारएप्रिल महिन्यापासून चंद्रपूरात सूर्य आग ओकत आहे. पारा ४५ अंशाच्या खाली उतरता उतरत नाही आहे. यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. अशातही काही भागातील नळांना नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक बेजार आहे. आता तब्बल ६० टक्के भागातील नळच दोन दिवस येणार नसल्यामुळे पाण्याची पर्यायी सुविधा नसणाºया नागरिकांवर कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे पाण्यासाठी भर उन्हात भटकंती करण्याची पाळी आली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई