भद्रावती: स्थानिक नीळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा, भद्रावतीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पाणी बचत जनजागरण जलदिंडी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भद्रनाग मंदिर ते नागपूर मार्ग आणि नागपूर मार्ग ते शिंदे महाविद्यालयपर्यंत विविध घोषणांद्वारे ही रॅली फिरविण्यात आली. समारोपीय कार्यक्रम महाविद्यालयात घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विवेक शिंदे, तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके होते. त्यांनी आपल्या भाषणातून पाण्याचे मानवी जीवनातील महत्व पटवून देताना पृथ्वीवरील संपूर्ण ऋतूमधील बदल पाण्यामुळेच घडून येतात, असे सांगितले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. प्रविणकुमार नासरे यांनी आपण जशी पैशाची बचत करतो, तशीच पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे. अन्यथा पाणी तुपाच्या भावाने विकत घ्यावे लागेल, असे ते म्हणाले. तसेच पशुपक्षी आपले जीवन जगताना नियोजन करताना त्याचप्रमाणे मानवाने सुद्धा पाण्याविषयी नियोजन आखले पाहिजे असे प्रा. डॉ. नरेंद्र हरणे यांनी आपल्या भाषणातून उपस्थिताना सांगितले.संचालन भूगोल विभाग प्रमुख प्रा. प्रमोद वसाके यांनी केले तर प्रास्ताविक पुरुषोत्तम मत्ते यांनी केले. प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटन मंत्री पुरुषोत्तम मत्ते यांनी केले. आभार विठ्ठलराव ठवळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. शित्रे, शेख घुमे, वामन नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, रमेश गाठे, प्रा. प्रकाश रामटेके व इइतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
भद्रावतीमध्ये पाणी बचत जनजागरण जलदिंडी
By admin | Updated: March 20, 2015 01:11 IST