शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेकडो बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:05 IST

यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देपाण्याची पातळी घटल्याने जलसंकट : बहुतांश बंधाऱ्यांचे कामही अर्धवट

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यंदा कमी प्रमाणात पाऊस पडल्याने पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. मात्र अत्यल्प पावसामुळे बंधाऱ्यातही ठणठणाट आहे. शेतीच्या सिंचनासोबतच गावागावात जलसंकटाची बिकट समस्या निर्माण होत असल्याने यावर्षी पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवारसारखी सिंचनाच्या दृष्टीने शेतकºयांचे भले करणारी योजना अंमलात आणली. यापूर्वीही शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही. हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच नदी, नाले, तलाव, बंधाºयात पाणी नसल्याने यावर्षी मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खाली गेल्याने गावकºयांची चिंता वाढली आहे. यावर्षी कमी पाऊस पडल्याने पाण्याची समस्या उग्ररूप धारण करीत आहे. शेतीला पाणी नसल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.राजुरा तालुक्यात शेकडो बंधारे शासनाने बांधले आहेत. मात्र आजघडीला या बंधाऱ्यात पाण्याचा थेंबसुद्धा उरला नाही. काही बंधारे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहून गेले आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या कंत्राटदारांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.शासन बंधाऱ्यावर लाखो रूपये खर्च करीत असेल आणि त्या बंधाºयाचा नागरिकांना, संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळत नसेल तर बंधारे बांधून काय फायदा, असा प्रश्न आता जनमाणसात विचारला जात आहे. यंदा पाण्याची समस्या अधिकच बिकट बनली असून राजुरा तालुक्यातील बहुतांश गावांवर आतपासूनच जलसंकट घोंगावत आहे.बोअरवेलही आटल्याकधी न आटणाऱ्या शेतातील बोअरवेल यंदा आटल्या आहेत. रब्बी हंगामातील हजारो हेक्टर शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. सिंचनाअभावी यावर्षी उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिघडणार आहे.