शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत एकदा पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:28 IST

चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाºया इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.

ठळक मुद्दे१ मार्चपासून अंमलबजावणी : पाणीटंचाईमुळे महापालिकेचा निर्णय

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता महानगरपालिकेने १ मार्चपासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय काकडे, महापौर अंजली घोटेकर यांनी दिली.सध्या इरई धरणात केवळ २३ क्युबिक मीटर जलसाठा आहे. यातील ४.८० क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राकडून वीज निर्मितीसाठी घेतले जाते. एक क्युबिक मीटर पाणी दर महिन्याला चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी लागते. तर दोन क्युबिक मीटर पाणी केवळ बाष्पिभवनामुळे कमी होते. त्यामुळे सध्या धरणात अस्तित्वात असलेले पाणी पावसाळ्याला सुरुवात होईपर्यंत टिकविणे व नागरिकांना देणे मनपापुढे आव्हान आहे. यासाठी मनपाने पाणी टंचाई आराखडा तयार केला असून त्यात अनेक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयुक्त काकडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. वास्तविक फेब्रुवारी महिन्यातच एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार होता. मात्र अस्तित्वात असलेले पाणी बघता हा निर्णय मागे घेण्यात आला होता. मात्र आता बिकट परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मनपाला एक दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा लागल्याचेही आयुक्त काकडे म्हणाले.१ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दोन दिवसातून आता एकदाच नळाद्वारे पाणी मिळू शकणार आहे.इरई नदी व धरणात मातीचा बंधारासंभाव्य पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून इरई धरण येथे विहिरीसभोवताल मातीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. याशिवाय दाताळा येथील इरई नदीवरही एक बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्याचे काम सुरूही झाले आहे, अशी माहितीही काकडे यांनी दिली.विहिरी केल्या स्वच्छपाणी टंचाई काळात विहिरीतून नागरिकांना शुध्द पाणी घेता यावे, यासाठी शहरातील विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यातील ३९ विहिरींबाबत अहवाल आला असून या विहिरीत पाणी पिण्यायोग्य आहे. त्यामुळे या विहिरी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. आणखी ६५ विहिरींचा अहवाल आल्यानंतर त्या विहिरीत पाणीही नागरिकांना उपयोग पडणार आहे. याशिवाय शहरातील चार मोठ्या विहिरींवर हातपंप बसवून पाणी पुरवठा केला जाणार आहे.४५४ हातपंप उपलब्धशहरातील हातपंपांचीही मनपाद्वारे तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत शहरातील २०० हातपंप बंद असून ते सुरू होण्याची शक्यताही नसल्याचे आढळून आले. त्यामुळे उर्वरित ४५४ हातपंप सुरू करण्यात आले असून या हातपंपांची दररोज तपासणी केली जाईल. उन्हाळ्याच्या दिवसात या हातपंपाच्या देखभाल दुरुस्तीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.नळाच्या वेळात भारनियमननळाद्वारे पाणी पुरवठा होताना अनेकजण मोटरपंप लावून पाण्याचा उपसा करतात. त्यामुळे मोटरपंप जप्तीची मोहीम मनपाद्वारे सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नळ येण्याच्या वेळात भारनियमन करण्यात यावे, यासाठी महावितरणला विनंती करण्यात आली आहे. भारनियमन असल्याने कुणीही मोटरपंप लावणार नाही, हा त्यामागील उद्देश असणार आहे.नवीन कनेक्शन नाहीइरई धरणात अत्यल्प जलसाठा असल्याने पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत शहरात कुणालाही नवीन नळ कनेक्शन देण्यात येणार नसल्याचे मनपा आयुक्त काकडे यांनी यावेळी स्पष्ट केले. याशिवाय नवीन बांधकामालादेखील परवानगी देण्यात येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.