शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळी घटली

By admin | Updated: May 23, 2014 23:45 IST

वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यातील खाण परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने शेतातील मोटारपंप कोरडे पडत आहे. उन्हाळी शेतपिकांवर त्याच्या विपरीत परिणाम होत आहे.

प्रकाश काळे - हरदोना

वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यातील खाण परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने शेतातील मोटारपंप कोरडे पडत आहे. उन्हाळी शेतपिकांवर त्याच्या विपरीत परिणाम होत आहे. वेकोलि परिसरातील १० ते १२ गावांना पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळी खोल जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणार्‍या राजुरा तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहे. या कोळसा खाणी देशाच्या विकासात भर घालणार्‍या असल्या तरी, त्याचे दुष्पपरिणाम कोळसा खाण परिसरातील जनतेला सहन करावे लागत आहे. गोवरी, पोवनी, सास्ती, साखरी, अंतरगाव, गोयेगाव परिसरात कोळशाचे मुबलक प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने शेतकर्‍यांच्या जमिनी अधिगृहित करून कोळसा खाण सुरू केल्या. खासगी बोअरवेलपेक्षा कोळसा खाणी २०० ते ३०० फुट खोल असल्याने परिसरात असलेल्या गावांतील पाण्याची पातळी खालावत आहे. वेकोलि पाण्याचा प्रचंड उपसा करीत आहे.पाण्याचे स्त्रोत कोळसा खाणींकडे खेचले जातात. त्यामुळे वेकोलिलगत शेती असणार्‍या शेतकर्‍यांच्या बोरवेल कोरड्या पडत आहे. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला असल्याने उन्हाळी शेतीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सिंचन करून शेती पिकविण्याचा मानस असताना शेतात बोरवेल खोदल्या आहे. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने बोरवेल कुचकामी ठरत आहे. बोअरवेल सुरु केल्यानंतर १५ ते २० मिनीटानंतर पाणी बाहेर येते. त्यामुळे सिंचन करणे आता कठिण झाल्याची प्रतिक्रिया गोवरी येथील शेतकरी प्रभाकर जुनघरी यांनी दिली. वेकोलि लगत असलेल्या शेतकर्‍यांना जंगली प्राण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शेतात जागल केल्यानंतरही वन्यप्राण्याचे कळप शेतपिकांवर तुटून पडतात. कोळसा खाणीतून धुळीचे लोंढे शेतपिकांवर येत असल्याने पीके पूर्णत: खराब होतात. परंतु वेकोलिकडून शेतकर्‍यांना कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही. राजुरा तालुका कापूस पिकासाठी अग्रेसर मानला जातो. परंतु कोळशाच्या धुळीने पांढरे सोने मातीमोल होत आहे. कापूस कोळशाच्या धुळीने काळा पडत असल्याने कापसाची प्रतवारी घसरुन शेतकर्‍यांनाा कवडीमोल भावात कापूस विकावा लागत आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकर्‍यांना सहन करावा लागतो. गोवरी, पोवनी, सास्ती, गोयेगाव, माथरा, साखरी, मानोली, बाबापूर, चार्ली, कळमना, निंबाळा, हिरापूर, अंतरगाव परिसरातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. सिंचनाची शेती पाण्याअभावी प्रभावीत झाली आहे. शेतात बोरवेल खोदली तर पाणी लागत नाही आणि पाणी लागले तर दीर्घकाळ पाणी शेतीसाठी पूरत नाही. अशी शेतकर्‍यांची बिकट अवस्था झाल्याने भविष्यात वेकोलि परिसरातील गावांना पाणी मिळणे कठीण जाणार आहे.