शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईनने शेतकºयांना पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:03 IST

शेतकरी आणि पालकमंत्री यांच्यातील स्नेहाचे नाते एखादी योजना कशी बदलवू शकते, याचा प्रत्यय शिवणी चोर येथील सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात आला.

ठळक मुद्दे शिवणी सिंचन प्रकल्प : आग्रहावरुन पालकमंत्र्यांनी केले योजेनेत परिवर्तन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शेतकरी आणि पालकमंत्री यांच्यातील स्नेहाचे नाते एखादी योजना कशी बदलवू शकते, याचा प्रत्यय शिवणी चोर येथील सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण कार्यक्रमात आला. शेतकºयांनी मागणी केल्यावरुन राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योजनेत परिवर्तन करण्याचे मान्य केले. आता शिवणी प्रकल्पातून पाईपलाईनने शेतकºयांना पाणी मिळणार आहे.१९७४ मध्ये मंजूर झालेला शिवणी चोर येथील प्रकल्प आपल्या पूर्ण क्षमतेने पुन्हा सुरु करण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार असतानापासून विधीमंडळात लढा दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील शेतकºयांशी पालकमंत्र्यांचा संपर्क आला आहे. दीर्घ लढ्यानंतर १९९२ पासून बंद झालेला हा प्रकल्प २०१७ मध्ये महत प्रयासाने सुरु करण्यात आला आहे. मंगळवारी या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या लोकार्पण सोहळयाला पोहचल्यानंतर काही शेतकºयांनी या प्रकल्पाची सिंचन क्षमता वाढवण्यासाठी व कमी पाण्यामध्ये बारमाही पिके घेण्यासाठी या प्रकल्पातून कालव्याने पाणी देण्याऐवजी पाईपलाईनव्दारे पाणी देण्याची मागणी केली. त्यामुळे त्यांनी योजनेत बदल करण्याची सूचना अधिकाºयांना केली. शिवणी चोर येथे मोठया प्रमाणात भाजीपाला क्लस्टर उभारण्याचा पालकमंत्र्यांचा मानस आहे. शिवणी चोर येथून हैद्राबाद, नागपूर व रायपूर या ठिकाणी भाजीपाला निर्मिती संदर्भातील प्रकल्प त्यांच्या मनात असून यासाठी या सिंचन प्रकल्पातील प्रत्येक पाण्याचा थेंब वापरण्याचा मनोदय त्यांनी यावळी बोलून दाखविला. सिंचनाच्या संदर्भातील योजनामधून पाईपलाईन संदर्भात तरतूद करता येत नसेल तर अन्य एखाद्या योजनेतून ही तरतूद करण्यात येईल. मात्र या ठिकाणच्या शेतकºयांच्या मागणीनुसार त्यांना पाईपलाईनने पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करु, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. या परिसरातील शेतकºयांनी सामुहिक शेतीसाठी प्रयत्न करावे. शेतीतूनच या भागाचा विकास अधिक होऊ शकतो व त्यासाठी आपण प्रयत्न करु, असेही त्यांनी सांगितले.सिंचन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, स्थाई समिती सभापती राहुल पावडे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता वेमूल कोंडा, कार्यकारी अभियंता राजेश सोनोने, ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थित होती.