शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

चंद्रपूरकरांवर पाण्याचे दुर्भिक्ष

By admin | Updated: July 26, 2015 01:27 IST

चंद्रपूरकरांना समस्यांशी दोन हात करणे जणू पाचवीलाच पूजले आहे. एका पाठोपाठ एक असे समस्यांचे डोंगर पार करीत येथील नागरिकांना आयुष्य पुढे रेटावे लागत आहे.

पाच सिंचन प्रकल्पात ठणठणाट : इरई धरणात केवळ ४४ टक्के पाणीरवी जवळे चंद्रपूरचंद्रपूरकरांना समस्यांशी दोन हात करणे जणू पाचवीलाच पूजले आहे. एका पाठोपाठ एक असे समस्यांचे डोंगर पार करीत येथील नागरिकांना आयुष्य पुढे रेटावे लागत आहे. रस्ते, घाणीचा विळखा, बॅक वॉटर या समस्यांचा निपटारा होत नाही तोच आता नव्या संकटाची चाहूल लागत आहे. यंदा पावसाने नव्हे तर पावसाळ्यानेच हुलकावणी दिल्याने चंद्रपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या इरई धरणात अत्यंत कमी जलसाठा शिल्लक आहे. १६०.२४५ मीटर क्षमता असलेल्या या धरणात सध्या पावसाळ्यातच केवळ ७१.६४९ मीटर एवढे पाणी आहे. याची टक्केवारी केवळ ४४.७१ आहे. त्यामुळे पुढे पाऊस बरसला नाही तर चंद्रपूरकरांवर पाण्याचे मोठे दुर्भिक्ष ओढविणार आहे. चंद्रपूरकर मागील दहा वर्षांपासून एक ना अनेक समस्यांपासून त्रस्त आहेत. रस्ते, नाल्या, तप्त उन्हाळा, प्रदूषण, घाणीचा विळखा यासारख्या समस्या चंद्रपूरकरांच्या पाचवीलाच पूजल्या आहेत. अलिकडच्या काही महिन्यात यातील काही समस्यांचा निपटारा महानगरपालिकेकडून केला जात असला तरी दुसरी समस्या आ वासून उभीच राहते. सध्या चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने चांगलेच त्रस्त करुन सोडले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरण्या आटोपल्या. मात्र प्रारंभी तीन दिवस संततधार स्वरुपात बरसणारा पाऊस अचानक दृष्ट लागावा, असा गायब झाला आहे. तो पुन्हा त्याच लयीने अद्यापही परतला नाही. संपूर्ण जिल्ह्याची पावसाची आकडेवारी बघितली तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४५८.४२ मिमी पाऊस पडला आहे. पावसाळ्यातील जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ११३५.४०६ मिमी आहे, हे येथे उल्लेखनीय. जुलै महिना हा खरा पावसाचा महिना समजला जातो. मात्र यंदा जुलै महिना संपत आला असतानाही पावसाचे रंग काही बरे दिसत नाही. पाहिजे त्या प्रमाणात पाऊस बरसत नसल्यामुळे हळूहळू पाण्याचे मोठे संकट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचीही स्थिती काही चांगली नाही. ११ सिंचन प्रकल्पापैकी असोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चारगाव आणि लभानसराड या पाच प्रकल्पात पावसाळा सुरू असताना पाण्याचा ठणठणाट आहे. या अत्यल्प पावसाचा खरीप हंगामाला म्हणजेच शेतकऱ्यांना तर फटका बसणार आहेच; पण सर्वसामान्य नागरिकांना, उद्योगांनाही पुढे मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. चंद्रपूरकरांना इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. म्हणजेच साडेचार लाख लोकांची तहान सध्या इरई धरणच भागवित आहे. मात्र या धरणाची सध्याची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. १६०.२४५ मीटर क्षमता असलेल्या या धरणात सध्या पावसाळ्यातच केवळ ७१.६४९ मीटर एवढे पाणी आहे. मागील वर्षी जुलैअखेर या धरणात ८४.८७० मीटर एवढे पाणी होते. मात्र आता ते केवळ ४४.७१ टक्के आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी आॅगस्टमध्ये आणि पुढेही अधेमधे चांगला पाऊस आल्याने धरणाची स्थिती मजबुत झाली होती. आता पावसाची हुलकावणी अशीच कायम राहिली तर पुढे हिवाळा आणि त्या पाठोपाठ येणारा उन्हाळा चंद्रपूरकरांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळविणार आहे.वीज निर्मितीवरही परिणामइरई धरण चंद्रपूर शहराची तहान भागविते. तसेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातही वीज निर्मितीसाठी या धरणातून पाणी वापरले जाते. धरणात केवळ ४४ टक्के जलसाठा असल्याने महाऔष्णिक वीज केंद्रातील वीज निर्मितीही प्रभावित झाली आहे. दोन हजार ३४० मेगावॅट क्षमतेच्या या केंद्रातून सध्या बाराशे ते तेराशे मेगावॅट वीज निर्मिती होत आहे. पाऊस समाधानकारक पडला नाही तर वीज निर्मितीवर विपरित परिणाम होणार आहे.तेव्हा माना खाणीचा होता पर्याय२०११-१२ मध्ये अशी परिस्थिती चंद्रपूरकरांवर ओढविली होती. त्यावेळीही पावसाळ्याने दगा दिल्याने इरई धरणात अत्यल्प जलसाठा होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनानेही एक चुक केली होती. धरणात पाणी असताना गरज नसतानाही धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला होता. त्यावेळी चंद्रपूरकरांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. दोन दिवसाआड नळातून पाणी पुरवठा व्हायचा. त्यावेळी माना खाणीतील पाणी शुध्दीकरण करून चंद्रपूर शहरात पुरवठा करण्याचे काही सामाजिक संघटनांनी सूचविले होते. प्रशासनासोबत याबाबत चर्चाही झाली होती.