शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 22:48 IST

जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामावर संकट : बल्लारपूर तालुक्यात धान व कापूस पीक धोक्यात

अनकेश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या निसर्गाच्या जलचक्रावर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम अवलंबून आहे. मात्र मागील दोन आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आजघडीला बल्लारपूर तालुक्यात ५६ टक्केच पर्जन्यमान झाले. आता धान्य व कापूस पिकाला पुन्हा एकदा जोरदार पावसाची गरज आहे. यामुळे पिकांना संजीवनी मिळणार आहे. मात्र निसर्गाची हुलकावणी सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.बल्लारपूर तालुक्याचे सरासरी ११३२ मिमी पर्जन्यामान आहे. मागील वर्षी तालुक्यात केवळ ४१.८७ टक्केच पाऊ स पडला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप व रब्बी हंगामावर विपरीत परिणाम झाला आणि बळीराजा आर्थिक संकटात ओढला गेला. यावर्षी देखील तालुक्यातील शेतकºयांवर अरिष्ठ ओढावल्याचे चिन्ह दिसत आहे. आजतागायत तालुक्यात ६३४.४ मिमी पावसाची नोंद झाली. तरीही शेतशिवार कोरडे आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.तालुक्याचे कृषी क्षेत्र कोरडवाहू असल्याने सिंचन सुविधाचा अभाव आहे. नाममात्र शेतकºयांकडे ओलीताची सोय असली तरी मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांचे कृषी व्यवसाय निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र आॅगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने हुलकावणी देण्यास सुरूवात केली. यामुळे शेतकरी गतवर्षीच्या संकटातून सावरण्याऐवजी पुन्हा संकटाच्या मार्गावरून वाटचाल करीत आहे.शेती व्यवसाय दरवर्षी तोट्यात जातोे. तरीही शेतकरी उत्पादनासाठी जीव ओतून राबतो. पीक कर्जाचा अडथळा पार करून काहींनी कर्ज घेतले. काहींनी सावकाराकडून कर्ज घेत बी-बियाण्यांची व खताची तरतूद केली. मशागत केलेल्या शेतात पेरणी केली. मात्र निस२र्गाची साथ बळीराजाला मिळत नसल्याने हिरवेगार पीक करपण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी येत आहे.७ हजार ११५ हेक्टर क्षेत्रात खरिपाची लागवड७ हजार ११५ क्षेत्रात तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली आहे. यामध्ये २ हजार ३९० हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड करण्यात आली. कापसाचे प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र ३ हजार ९८२ हेक्टर इतके आहे. सोयाबीन १२८ हेक्टरमध्ये लागवड असून गळीत धान्य १२८, हळद ९.३०, मिरची ८ व भाजीपाला १०७ हेक्टरमध्ये लावण्यात आले आहे.