शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

जिल्ह्यात जलसत्याग्रह चळवळ सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 00:31 IST

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे,

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न बघितले असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहे. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.७३ व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे शानदार आयोजन जिल्ह्याधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. या सोहळ्याला खासदार बाळू धानोरकर, आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्य संग्राम सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.पालकमंत्री मुनगंटीवार पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरिता विविध सिंचन योजना पूर्णत्वास आल्या असून यामध्ये चीचडोह प्रकल्पामुळे चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला फायदा होणार आहे. सोबतच कोटगल, पळसगाव-आमडी, चिंचाळा प्रकल्पही पूर्णत्वास आले आहे. मोठ्या प्रमाणावर बंधाºयाचे काम या जिल्ह्यात सुरू झाले आहेत. प्रत्येकाच्या शेतापर्यंत पाणी पोहचून आपला जिल्हा येत्या पाच वर्षात पाणीदार व्हावा, याकरिता संकल्प केला असून ४ आॅगस्ट रोजी जलपुरुष राजेंद्र सिंह व सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या उपस्थितीत जलसाक्षरता अभियानाला गती देण्यासाठी संकल्प केला आहे. जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतीच्या सहभागाने जलसत्याग्रह चळवळ सुरू करण्यात येणार आहे. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.राज्यातील निराधार, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता महिलांचे अनुदान सहाशे रुपयावरून एक हजार रुपये व दोन मुले असल्यास बाराशे रुपयेपर्यंत वाढवले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे हे शंभरावे जयंती वर्ष असून त्यांच्या नावाने भारतीय डाक विभागाशी प्रयत्नपूर्वक संपर्क करून डाक तिकीट सुरू केले आहे. शासनाने सोलर चरख्याकरिता आठ कोटी ९० लाख रुपयांची तरतूद केली आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कारया सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा नियोजन विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मुजीब शेख, अशोक राऊत, ज्ञानू लवटे, अजय राठोड तसेच शंभर टक्केपेक्षा जास्त महसूल गोळा केल्याबद्दल अनुप हंडा, भारवी जिवने, आशिष राठोड, रमेश गुज्जनवार, पौर्णिमा उईके, गजानन भुरसे, भगवान रणदिवे, अरविंद डाहुले, सूर्यकांत ढाकणे, प्रफुल्ल चिडे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभागामार्फत सीमा मामीडवार, छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत उथळपेठ, आठवीमध्ये राज्य गुणवत्ता यादीमध्ये नववे स्थान संपादन केल्याबाबत वेदांत येरेकर, आरोग्य विभागात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सूर्यकांत बाबर, डॉ. जिनी पटेल, डॉ. उल्हास सरोदे, संवर्ग विकास अधिकारी बागडी, डॉ. संदीप गेडाम, डॉ. सुधीर मेश्राम, छाया पाटील, केंद्र शासनाचे गृह विभागाकडून उत्तम जीवन रक्षा पदक प्राप्त डॉ. चरणजीतसिंग सलुजा, पोलीस विभागामार्फत शेखर देशमुख, हृदयनारायण यादव, प्रकाश कोकाटे, स्वप्निल धुळे, दीपक गोतमारे, किसन शेळके, विठ्ठल मुत्यमवार, धर्मेंद्र जोशी, ए. एम. सय्यद, महेश कोंडावार, महेंद्र आंभोरे, प्रशांत केदार, विकास मुंडे, नीलेश वाघमारे, संदीप कापडे, संदीप मिश्रा, दिलीप लोखंडे, आकाशकुमार साखरे, तीर्थराज निंबेकर, सुधीर बंडावार, कुणाल रामटेके यांना विशेष सेवा पदक तर भीमा वाकडे, रमेश पढाल, एस. खैरकर यांना महासंचालक यांचे विशेष सन्मान चिन्ह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. उत्कृष्ट कार्यालयीन कामाकरिता विवेक कोहळे तसेच आपत्ती निवारणाकरिता शोध व बचाव पथकाचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये सुनील नागतोडे, शरद बनकर, गजानन पांडे, अजय यादव, राहुल पाटील, विपिन निंबाळकर, मयूर चहारे, मोरेश्वर भरडकर, निळकंठ चौधरी, राष्ट्रपाल नाईक, पुंडलिक ताकसांडे, टी.डी. मेश्राम, इन्द्रपाल बैस, के. एम. वलेकर, व्ही. एन. ढुमणे यांचा समावेश आहे.आठ दिवसात जिल्हा गॅसयुक्तजिल्ह्याचा विचार केल्यास येथील जनतेने जिल्हा पुढे जावा याकरिता भरपूर प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक योजना राबवलेल्या असून बीपीएलमध्ये नाव नसेल तरीही दोन रुपये, तीन रुपये किलो अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी निर्णय घेतलेला आहे. तसेच संपूर्ण राज्य चूलमुक्त व धूरमुक्त करून गॅसयुक्त करण्याकरिता अभियान राबवलेले आहे. जनसामान्यांना गॅस कनेक्शन देण्यात राज्यात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर असून यावेळी घोषित करू इच्छितो की येत्या आठ दिवसात चंद्रपूर जिल्हा गॅस युक्त झालेला राज्यातील पहिला जिल्हा असेल, अशी माहिती ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.चांदा- कृषी मोबाईल अ‍ॅपध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमानंतर कृषी अ‍ॅपचे उदघाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा कार्यालय यांच्या वतीने चांदा कृषी मोबाईल अ‍ॅप सुरू करण्यात आले. या अ‍ॅपच्यामार्फत जिल्ह्यातील विविध कृषी योजना तसेच लाभार्थ्यांची माहिती, कृषी विषयक सल्ला, शेतकºयांनी साकारलेले प्रयोग, त्यांच्या यशकथा याबाबतची माहिती या अ‍ॅपमार्फत दिली जाणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार