शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पहाडावरील १० गावांमध्ये पेटणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 23:24 IST

तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविहिरींनी तळ गाठला : पाण्यासाठी महिलांची भटकंती

मनोज गोरे ।आॅनलाईन लोकमतकोरपना : तालुक्यातील दहा गावांमध्ये विहिरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने ही समस्या लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना केली नाही तर नागरिकांचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे.यंदा पाऊस कमी पडल्याने पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले. पहाडावरील अनेक गावांमधील बोरवेल बंद पडल्या. पिण्याच्या पाण्यासाठी अन्य साधन नसल्याने महिलांचे हाल होत आहे. संवर्ग विकास अधिकारी घोन्सीकर, तहसीलदार गाडे यांनी नुकताच टंचाईग्रस्त गावाचा दौरा करुन पाहणी केली. सरपंच व ग्रामसचिवांकडून माहिती मागवून उपाययोजना केल्याचे सांगण्यात आले. परंतु पत्येक्षात कोणतेही कामे सुरू झाली नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.टंचाईग्रस्त गावांमधील महिला प्रशासनाविरुद्ध नाराजी व्यक्त करीत आहेत. कातलाबोडी, पारधीगुडा, शिवापूर, बोरगाव, भोईगुडा, परसोडा गुडा, भागलहिरा, उमरहिरा आदी गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या समपातळीवर असलेल्या गावांमध्ये टंचाई नाहीत. परंतु, अनेक बोरवेल बंद आहेत. ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केली. परंतु आर्थिक मर्यादा आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई गावाची माहिती घेवून तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा एप्रिल- मे महिन्यात पाण्यासाठी गावागावांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे हालयेथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात पाण्याची भीषण टंचाई आहे. पाणी मिळत नसल्याने बाहेरुन आणण्याची वेळ आली. ग्रामीण रुग्णालयात पुरेसे पाणी मिळत नाही, असा आरोप केला जात आहे.पाण्याची टाकी शोभेची वास्तूग्रामीण रुग्णालय परिसरात पाण्याची टाकी बांधण्यात आली. पुरेसे पाणी मिळत नसल्याने शोभेची वास्तू ठरली आहे. पंचायत समिती, पोलीस स्टेशन व विविध शासकीय कार्यालयामध्येही मुबलक पाणी मिळत नाही.शहरामध्ये टंचाई निर्माण झाल्यास टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात आम्ही खबरदारी घेत आहोत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेवून उपाययोजनेचा आराखडाही तयार करण्यात आला आहे.- नंदा बावणे, नगराध्यक्ष, कोरपनातालुक्यातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. संकटग्रस्त गावांमध्ये तातडीने उपाययोजना केली जाणार आहे.- हरिश गाडे, तहसीलदार, कोरपना