शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचा दारुविक्रेत्यांवर वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:16 IST

धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोे. होळीला दारु प्राशन करुन धुळवड खेळण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल राहत असल्याने अनेकजण मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारुला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे.

ठळक मुद्देअधिकारी सतर्क : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोे. होळीला दारु प्राशन करुन धुळवड खेळण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल राहत असल्याने अनेकजण मद्याची व्यवस्था करण्याच्या तयारीत लागले आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारुला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस विभाग सतर्क झाला आहे.जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर दारुविक्री विरोधात ठोस भूमिका घेत आहेत. तसे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्देशही आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पंधराही तालुक्यात कोणकोणत्या छुप्या मार्गाने दारुची आयात केली जाते. कोणत्या वेळेत दारुची आयात होते, याबाबतची सर्व माहिती ठेवून दारु बंदी करण्यासाठी कृती कार्यक्रमही आखण्यात आला आहे. त्याच अनुषंगाने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने चंद्रपूर, घुग्घुस, राजुरा, वरोरा शहरातून जाणाºया मुख्य मार्गावर नाकाबंदी केली गेली आहे. सर्वच मुख्य मार्गावर पोसिलांकडून नाकाबंदी सुरु आहे. या नाकाबंदीरम्यान आवागमन करणारी दुचाकी, चारचाकी वाहनांची कसून तपासणी केली जाणार आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून प्रक्रिया सुरु आहे. या काळात होळी सणानिमित्त नागरिकांना दारु पुरविण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांची राजकीय पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यावरही नजर ठेवली आहे.४ लाख ३ हजार दोनशे रुपयांची दारू जप्तजिवती : तालुक्यातील पिट्टीगुडा (नंदप्पा) पोलिसांनी बुधवारी पहाटे मौजा झालीगुडा येथे ४ लाख ३ हजार दोनशे रुपयांची दारू जप्त केली. यासंदर्भात वाहन चालक श्रिनीवास राजय्या चिटावेना (२५) रा.गोदावरीकनी जि. पेदापल्ली (तेलंगणा) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपी फरार आहेत. आोरपी बोलेरो पीक अप क्र.टीएस.२२ टी ३०५७ मध्ये दारू घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून ५६ पेट्या दारू, चार लाख तीन हजार दोनशे रुपये व बोलेरो पीक अप किंमत चार लाख रुपये असा आठ लाख तीन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीनंतर जिवती तालुक्यातील ही पहिलीच मोठी कारवाई असल्याचे समजते. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल आळंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल बडकेलवार,विशाल बगळे,राहुल चांदेकर,खंडेराव माने आदींनी केली.७५ हजारांचा हातभट्टी दारूसाठा जप्तचंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सिंदेवाही तालुक्यातील सरडपार येथील शिवारात छापा टाकून ७५ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त केला आहे. घटनास्थळी कोणीच उपस्थित नसल्याने सदर साठा बेवारस म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनात दुय्यम निरीक्षक ए.डब्ल्यू. क्षीरसागर, किशोर पेदूजवार, जगदीश मस्के, संदीप राठोड आदींनी केली आहे.