शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

वरोरा १९५, राजुरा १०५, सिंदेवाही १७, मूल ७२ अर्ज

By admin | Updated: October 30, 2016 00:43 IST

नगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकींसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले.

नगरपरिषद निवडणूक : विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी दाखल, नगराध्यक्षपदासाठीही नामांकन चंद्रपूर: नगरपालिकेच्या सर्वसाधारण निवडणुकींसाठी शनिवारी शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले. वरोरा येथे १२ प्रभागासाठी १९५, राजुरा १८ प्रभागांसाठी १०५ अर्ज, सिंदेवाही १७ प्रभागासाठी ११५ अर्ज, बल्लारपुरात १६ प्रभागांसाठी १९६ आणि मूल मधील आठ प्रभागासाठी ७४ जणांनी उमेदवारी दाखल केली. यावेळी नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून करण्यात येत असल्याने त्या पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्या वरोरा नगराध्यक्ष पदासाठी १६ अर्ज आले आहेत. मूलमध्ये १० अर्ज, बल्लारपुरात २२ आणि राजुरा नगराध्यक्षपदासाठी १३ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.वरोरा नगरपरिषदेत २४ नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता १२ प्रभागात १९५ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. खुल्या वर्गासाठी नगराध्यक्षाचे पद असून १६ जणांनी दावेदारी दाखल केली आहे. नगराध्यक्षपदासाठी काँग्रसचे विलास टिपले, भाजप ऐतेशाम अली, शिवसेना पुरुषोत्तम खिरटकर, राष्ट्रवादी काँग्रेस नितीन मत्ते, मनसे राहुल जानवे, बसपा अ‍ॅड. रोशन नकवे, बीआरएसपी अ‍ॅड. विनोद हरले, भारिप-बमसं समीश पाटील आणि अपक्षांमध्ये खेमराज कुरेकार, छोटू शेख, दीपक गोडे, जगदीश लांडगे, अ‍ॅड. प्रदीप पुराण यांनी आपले नामांकन दाखल केले आहे.मूल नगरपालिकेच्या पुनर्रचनेत आठ प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. त्याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना, रिपाइं आदी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नामांकन दाखल केले. त्यामध्ये ७४ अर्ज दाखल झाले आहेत. मूल नगराध्यक्षपद महिला (सर्वसाधारण) राखीव असून त्याकरिता १० अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी दाखल करण्यासाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह नगरसेवका पदांचे उमेदवारही एकत्र आले होते. त्यामुळे यावेळी एक प्रकारे राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.सिंदेवाही नगरपंचायतीची निवडणूक करीता उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या दिवशी १७ प्रवर्गासाठी ११५ फॉर्म भरण्यात आले. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी, बीएसपी या पक्षाच्या उमेदवारांनी फॉर्म संपले. काँग्रेस व भाजपा उमेदवार जवळपास निश्चित झाल्याने आज काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत दिग्गज नेत्यांची उमेदवारी कमी करण्यात आल्याने अनेक प्रवर्गामधून बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. भाजपामध्ये ही बंडखोरी होवून अपक्ष लढण्याची तयारी काही उमेदवारांनी दाखविली आहे. ज्या नागरिकांनी आ.विजय वडेट्टीवार यांची भटे घेवून शहराच्या विकासात अडचणी निर्माण करतात त्यांना उमेदवारी देऊ नये, असे बोलून आ. वडेट्टीवार यांनी उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे येणाऱ्या दिवसात काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारी मागे घेण्याची तारीख २ नोव्हेंबर आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होईल. २१ नोव्हेंबरला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर २७ नोव्हेंबरला सकाळी १० वाजतापासून मतदान होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)राजुरा नगराध्यक्षपदासाठी १३ नामांकननगराध्यक्षपदासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अरुण धोटे, भारतीय जनता पार्टी सतीश धोटे, विदर्भ विकास आघाडी (बंडखोर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस युती) स्वामी येरोलवार, शेतकरी संघटना प्रा. अनिल ठाकूरवार, शिवसेना नितीन पिपरे, बहुजन समाज पार्टी सुरेश मेश्राम, बंडखोर राष्ट्रवादी काँग्रेस शरीफ सिद्धिकी, बंडखोर भाजपा विनायक देशमुख, अरुण मस्की, अपक्ष गजानन मस्की, चरणदास नगराळे, गोपाल सारडा, गनगाधर जाधव. भाजपा- राष्ट्रवादी काँग्रेस शक्तीप्रदर्शननामांकनाच्या शेवटच्या दिवशी राजुरा येथे भाजपा आणि विदर्भ विकास आघाडीने शहरात नागरिकांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करुन नामांकन दाखल केले. भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्ष व १८ नगरसेवकांची यादी घोषित केली. या प्रसंगी बोलताना आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी राजुरा शहर विकासासाठी भाजपा रिपाइं युतीला संधी देण्याचे आवाहन केले.