शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वाघ बघायचा आहे, मग पोंभूर्णा गेटला भेट द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:27 IST

पाेंभूर्णा : चंद्रपूर वनवृत्त व मध्यचांदा वनविभागातील वनपरिक्षेत्र पाेंभूर्णांतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती केमाराच्या माध्यमातून केमारा गावालगतच्या वनक्षेत्रात ग्रामिणांच्या सक्रिय ...

पाेंभूर्णा : चंद्रपूर वनवृत्त व मध्यचांदा वनविभागातील वनपरिक्षेत्र पाेंभूर्णांतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समिती केमाराच्या माध्यमातून केमारा गावालगतच्या वनक्षेत्रात ग्रामिणांच्या सक्रिय सहभागातून वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्थापित करून वनाचे शाश्वत जतन करून ग्रामिणांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केमारा समितीच्या ठरावाद्वारे केमारालगतचे जुने मार्ग दुरुस्ती करून २० किलोमीटरचा कच्चा रस्ता पर्यटनासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे आता वाघ बघायचा असेल, तर पर्यटकांनी पोंभूर्णा भेटवरून वनभ्रमंती करावी.

वाघ व वन्यप्राणी, वनसंपदेची सुरक्षा व संवर्धनाकडे मागील काही वर्षांपासून वन विभागाने विशेष लक्ष दिल्याने प्रादेशिक वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रातही पर्यटन सफारी होऊ शकते, हे लक्षात आल्याने वन विभागाने पाेंभूर्णा वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या केमारा येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांना सोबतीला घेतले. पर्यटन सफारीचे महत्त्व समजवल्यानंतर समितीने काही दिवसांपूर्वीच ठराव पारित केला. नियोजनाप्रमाणे २५ मार्चला पाेंभूर्णा पर्यटन व मचान सफारीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या सभापती अल्का आत्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, तसेच माजी नगराध्यक्ष श्वेता वनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक कवडू कुंदावर, मध्य चांदाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक प्रीतमसिंह कोडापे, वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे, वनक्षेत्र अधिकारी यादव व संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पर्यटक उपस्थित होते.

बॉक्स

विविध वन्यप्राण्यांचा संचार

पाेंभूर्णा वन क्षेत्रात वाघ व विविध वन्यप्राण्यांची संख्या लक्षवेधी आहे. पट्टेदार वाघांच्या अधिवासासाठी पाेंभूर्णा वनक्षेत्र पाेषक आहे. वाघ, बिबटे, रानगवे, चाैसिंगा, सायाळ, नीलगाय आदी प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत.

विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठीही हे क्षेत्र पाेषक आहे. १५० प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुलपाखरे यांचाही यात समावेश आहे.

बॉक्स

स्थानिकांना मिळणार रोजगार

दिवसातून सकाळी ६.०० ते १०.०० आणि दुपारी २.०० ते ४.०० वाजेपर्यंत प्रत्येकी सहा वाहने सोडण्यात येणार आहेत. प्रत्येक चारचाकी वाहनासाठी पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आले असून, तीनशे पन्नास रुपये गाइडचे शुल्क राहणार आहे.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर खासगी वाहनांना प्रवेश देणे सुरू झाले आहे.

भविष्यात नोंदणीकृत वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

स्थानिक युवकांना गाइड म्हणून प्रशिक्षित केले जात आहे. पाेंभूर्णा येथील सफारीसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या संकेतस्थळावरूनही पर्यटकांना बुकिंगची सुविधा भविष्यात उपलब्ध होणार आहे. या पर्यटन सफारीमुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्य वनसरंक्षक एन.आर. प्रवीण व वनपरिक्षेत्र अधिकारी आम्रपाली खोब्रागडे यांनी दिली.