शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध शेतकऱ्याची न्यायासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:42 IST

तालुक्यातील पुयारदंड येथील सदाशिव गवळी यांच्या एका मुलाची जागा मोखाबर्ळी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालव्याकरिता विक्री करून अधिग्रहित करण्यात आली. मात्र दुसऱ्या मुलाच्या वाटणीला आलेल्या जागेवर कोणत्याही पूर्व संमतीशिवाय खोदकाम करण्यात आले.

ठळक मुद्देदहा वर्षांपासून कार्यालयात चकरा : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : तालुक्यातील पुयारदंड येथील सदाशिव गवळी यांच्या एका मुलाची जागा मोखाबर्ळी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालव्याकरिता विक्री करून अधिग्रहित करण्यात आली. मात्र दुसऱ्या मुलाच्या वाटणीला आलेल्या जागेवर कोणत्याही पूर्व संमतीशिवाय खोदकाम करण्यात आले. ज्या जागेवर काम केले त्या भावाच्या जागेची विक्री केली नाही. या विरोधात न्यायासाठी शेतकऱ्याची दहा वर्षांपासून कार्यालयात पायपीट करीत आहे. मात्र न्याय मिळाला नाही. तर बावणथळी उपसा कालवा सिंचन प्रकल्प कार्यालय व कंत्राटदार दहा वर्षांपासून शेतकऱ्याला उडवाउडावीची उत्तरे देत आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्ळी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालवाच्या माती खोदकाम व बांधकामाकरिता सदाशिव गवळी यांनी आपसी वाटपाद्वारे भु.क्र. ८९/१ आराजी १.४६ हेक्टर शेतजमीन आपला मुलगा प्रकाश गवळी तर भु.क्र.८९/२ आराजी १.२० हेक्टर जमीन दुसरा मुलगा विकास गवळीला दिली. त्याची सातबाºयावर नोंद घेऊन दोघांचेही वेगळे-वेगळे सातबारे बनविले. विकास हा उदरनिवार्हाकरिता बाहेरगावी राहत असल्याने त्याच्या शेतीची देखभाल सदाशिव गवळीच करतात. कालव्याचे खोदकाम करताना प्रकाशकडून अधिग्रहित केलेल्या जागेव्यतिरिक्त विकासच्या मालकीच्या भु. क्र .८९ /२ मध्येही खोदकाम करण्यात आले. या विरोधात सदाशिव गवळी यांनी प्रकल्प अधिकारी व कंत्राटदारास जाब विचारला मात्र त्यांच्याकडून टोलवाटोलवी सुरु आहे.मागील दहा वर्षांपासून सिंमाकन करून ज्यादाच्या जागेत खोदकाम केले. त्यांच्या मोबदल्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनीधीकडे अनेकदा न्याम मागीतला. मात्र कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय आपल्याजवळ शिल्लक नाही.- सदाशिव डोमा गवळीअन्यायग्रस्त शेतकरी, पुयारदंड