शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या लोनवाही परिसरात शहराला पुरवठा करणारी विद्युत महावितरण तसेच पारेषण विभागाचे मुख्य कार्यालय आहे. लॉकडाऊनच्या काळात मागील काही दिवसांपासून पॉवर हाऊसमागील सुरक्षा भिंत दोन ठिकाणी कोसळली. काही ठिकाणी भेगा पडल्या असून पडण्याची भीती आहे. पॉवर हाऊसच्या मागील भागात वॉर्ड क्रमांक २ कॉलनीमधील नागरिकांना धोक्याची शक्यता आहे. शहराला याच कार्यालयातून अतिरिक्त विद्युत पुरवठा होत असतो. वाॅर्डातील लहान मुले याच परिसरात खेळत असतात. भिंत कोसळल्यामुळे धोका होईल. संबंधित विभागाने कोसळलेली भिंत दुर्लक्ष न करता लक्ष देऊन लवकरात लवकर दुरुस्त करावी, अशी वाॅर्डातील नागरिकांची मागणी आहे
लोनवाहीत महावितरणची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST