शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकरीसह २० पट वाढीव मोबदला

By admin | Updated: July 25, 2016 01:23 IST

भुमिअधिग्रहण कायदा १८९४ मध्ये वेकोलिद्वारे संपादित करण्यात आलेल्या, परंतु अत्यल्प मोबदला ...

चंद्रपूर : भुमिअधिग्रहण कायदा १८९४ मध्ये वेकोलिद्वारे संपादित करण्यात आलेल्या, परंतु अत्यल्प मोबदला असल्यामुळे मोबदला न उचललेल्या शेतकऱ्यांना; ज्या प्रकरणात निवाडा झालेला आहे, अशा सन २०१२ पुर्वी निवाडा झालेल्या प्रकरणामध्ये वाढीव दराचा उपयोग होत नव्हता. अशा शेतकऱ्यांना वाढीव दर मिळावा, यासाठी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. या निर्णयामुळे बहुप्रतिक्षीत व वंचित शेतकऱ्यांना करोडी रुपये मिळणार असून व जुन्या दरापेक्षा २० पट जास्तीचा मोबदला नोकरीसहीत वेकोलिद्वारे आता प्राप्त होणार आहे. कोल इंडिया लिमीटेडद्वारा सब्सीडरी कंपनी वेकोली तर्फे अधिग्रहीत होत असलेल्या जमिनीला एकरी ८ लाख ते १० लाख रुपये दर मिळवून देण्याकरिता कोल बेअरींग अ‍ॅक्ट १९५७ मध्ये ६ डिसेंबर २०१० ला दुरूस्ती केली. तसेच कोल इंडिया लिमिटेडच्या पुनर्वसन व पुर्नस्थापन निती २०१२ मध्ये वाढीव नवीन दराचा समावेश करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाला २५ मे २०१२ तसेच २२ आॅगस्ट २०१२ रोजी अध्यादेश काढण्यास भाग पडले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे यश आले. त्याची पुर्तता करण्याकरिता १४ प्रकल्पांना याचा लाभ देत शेतकऱ्यांना १४०० कोटी रुपये, ४ हजार २९६ नोकऱ्याही देण्यात आले. केंद्रातील युपीए सरकारने याबाबतीत दुरूस्ती करावी म्हणून नविन भुमिअधिग्रहण कायद्यात ३२ दुरूस्ती लावल्या व त्यात वंचित शेतकऱ्यांना वाढीव दर मिळावा म्हणून दुरूस्ती सुचविली. मात्र तत्कालीन सरकारने दुरूस्ती केली नाही. महाराष्ट्रातील त्यावेळी आघाडी सरकारने सुद्धा ही दुरूस्ती नाकारली होती. वेकोली हा सर्व पैसा देण्यास तयार होती. तरी पण त्यावेळी महाराष्ट्रातील आघाडी सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही व वाढीव दरापासून वंचित ठेवले. त्यावेळी सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी या दुरूस्तीसाठी बरेच प्रयत्न केले. बैठका व पत्रव्यवहार केला. परंतु महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने याबाबतीत शेतकऱ्यांना न्याय देण्याकरीता दुरूस्ती केली नाही. ना. अहीर यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तसेच व्यापक प्रमाणावर या विषयी बैठका लावल्या. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना २९ जून रोजी यश आले. महाराष्ट्र सरकारने अध्यादेशात दुरूस्ती केली व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंद पसरला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)