शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2015 01:27 IST

वेकोलिशी संबंधित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांशी निगडित समस्या, न्यायोचित मागण्या तसेच वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत...

एकोणा-२ खाण : शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी देण्याकरिता समितीचे होणार गठण चंद्रपूर : वेकोलिशी संबंधित प्रश्न, प्रकल्पग्रस्तांशी निगडित समस्या, न्यायोचित मागण्या तसेच वेकोलि माजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या एकोणा- २ या वेकोलि प्रकल्पाशी संबंधित बाबींवर केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा करून प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.नागपूर येथील रविभवनात पार पडलेल्या या बैठकीमध्ये ना. हंसराज अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांकडून अनेक प्रश्न, नोकरीविषयक प्रश्न, नवीन प्रकल्प व त्यांची अद्ययावत स्थिती, चर्चेदरम्यान उपस्थित केलेल्या अनेक मुद्यांच्या सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत एकोणा-२ या प्रकल्पातील प्रकल्ग्रस्तांच्या शेतजमिनीचा मोबदला येत्या १५ सप्टेंबर पर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल इंडियाच्या नवीन दरानुसार एकोणा प्रकल्पाशी संबंधित प्रकल्पग्रस्तांना ८३ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या बरोबरच वेकोलि प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदे देऊन नोकरीत सामावून घेण्याकरीता समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आगामी दोन महिन्यात ही समिती अहवाल सीआयएलला सादर करेल व त्यावर सीआयएल प्रबंधन सकारात्मक निर्णय घेईल, अशी माहिती वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा यांनी दिली.कलर ब्लाईडनेसमुळे नोकरी नाकारण्याच्या प्रश्नावर हंसराज अहीर यांनी नाराजी व्यक्त करुन प्रकल्पग्रस्तांवरील अशा प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. तेव्हा अधिकाऱ्यांनी कलर ब्लाईडनेसमुळे कुणालाही नोकरीपासून वंचित ठेवले जाणार नसून त्यांना गट ‘ब’ मध्ये नोकरी दिली जाईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी यावेळी केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिले.या बैठकीत वेकोलिचे अध्यक्ष प्रबंध निदेशक मिश्रा तसेच मुख्यालयातील अनेक विभागाचे अधिकारी, भाजपाचे चंद्रपूर जिल्हा सचिव राहुल सराफ, भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री राजू घरोटे, अंकुश आगलावे, पवन एकरे, डायरेक्टर टेक्निकल मल्ली, जनरल मॅनेजर एल अ‍ॅन्ड आर आझमी, जनरल मॅनेजर आय.आर. साहू तसेच वेकोलि प्रकल्पग्रस्ताचे प्रतिनिधी व प्रकल्पामुळे बाधित शेतकरी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)