शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
11
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
12
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
13
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
14
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
15
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
16
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
17
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
18
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
19
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
20
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन

५०० रुपयांसाठी उन्हात प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 05:01 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाँकडाऊन सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कामधंदे बंद पडले आहेत. लोक हातावर हात ठेऊन घरी बसले आहेत. नागभीड तालुक्यात दरवर्षी या महिन्यात शासनाच्या रोजगार हमीची कामे सुरू असायची. रोजगार हमीच्या या कामांवर ८ ते १० हजार मजूर कामावर असायचे. याशिवाय तालुक्यातील २५ ते ३० गावात मिरचीचे सातरे सुरू असायचे.

ठळक मुद्देबँकेसमोर ग्राहकांच्या रांगा : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे महिलांच्या जनधन खात्यात ५०० रुपये जमा करण्यात येत आहे. ५०० रूपयांसाठी खातेदारांना बँकांसमोर उन्हातान्हात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने लाँकडाऊन सुरू केले. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व कामधंदे बंद पडले आहेत. लोक हातावर हात ठेऊन घरी बसले आहेत. नागभीड तालुक्यात दरवर्षी या महिन्यात शासनाच्या रोजगार हमीची कामे सुरू असायची. रोजगार हमीच्या या कामांवर ८ ते १० हजार मजूर कामावर असायचे. याशिवाय तालुक्यातील २५ ते ३० गावात मिरचीचे सातरे सुरू असायचे. या सातऱ्यांवरही सात ते आठ हजार मजूर काम करायचे. आता रोजगार हमीची कामे आणि मिरची सातरेही बंद आहेत. लोकांचे सर्व आर्थिक प्रवाहच बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळत असलेली ५०० रुपयांची मदत खातेदारांना मोठा आधार ठरत आहेत.सदर अनुदान बँकेतून काढण्यासाठी या खातेदारांची बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेक बँकांनी आपले व्यवहार खातेदारांना आवारात ठेवूनच सुरू केले आहेत. खातेदार अगदी ९ वाजल्यापासूनच बँकेच्या आवारात जमा होत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने १० वाजेपासूनच सूर्य आग ओकायला सुरूवात करतो. या उन्हात बसून किंवा उभे राहून या खातेदारांना आपला नंबर केव्हा लागतो याची तासोगणती प्रतीक्षा करावी लागत आहे.उन्हामुळे दुकानाचा आसराकाही बँक खातेदारांच्या सोईसाठी आवारात छत टाकले आहे. छत तोकडे आहेत. त्यामुळे अर्धोपेक्षा अधिक खातेदार हे रस्त्यावर किंवा दुकानांच्या आडोशाचा आसरा घेत आहेत. सोशल डिस्टन्सिंगच्या नियम राखण्यासाठी काही खातेदारच बँकांच्या आवारात बसून असतात. मात्र तरीसुद्धा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत आहे.

टॅग्स :bankबँक