शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 20, 2016 00:33 IST

या वर्षी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर बळीराजाही शेतीच्या हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागला.

जिल्हा कोरडाच : हवामान खात्याच्या अंदाजानंतरही पाऊस नाहीचंद्रपूर : या वर्षी हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर बळीराजाही शेतीच्या हंगामपूर्व मशागतीच्या कामाला लागला. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुळव करून बी-बियाणांच्या खरेदी केली आहे. आता हंगामपूर्व मशागतीची कामेही संपुष्टात येत आहेत. दोन-तीनदा मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र हा पाऊस अत्यल्प होता. आता बळीराजाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.विशेष म्हणजे, हवामान खात्याने शनिवारी मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील सतत दोन वर्ष शेतकऱ्यांना दुर्दैवी ठरले. आधी अतिवृष्टीने मारले. नंतर अल्पवृष्टीने नुकसान केले. या दोन वर्षात शेतकरी चांगलाच कर्जबाजारी झाला. मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी पूर्णता खचून गेला होता. शासनाने मदतीची घोषणा केली. मात्र पैसेवारीत जिल्हा पात्र ठरला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक छदामही मदत मिळाली नाही. मागील दोन वर्षांचे झालेले नुकसान विसरून बळीराजा पुन्हा खरीपाच्या तयारीला लागला आहे. शेतातील अनावश्यक कचरा स्वच्छ करण्यात आला आहे. शेणखत टाकण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कुंपणाचीही आतापासूनच व्यवस्था करून ठेवलीे आहे. नांगरणी-वखरणीची कामेही सुरू असून तीसुध्दा अंतिम टप्प्यात आहे. इकडे कृषी विभागानेही खरीप हंगामाचे नियोजन करून ठेवले आहे. यंदा कृषी विभागाने ४ लाख ६७ हजार ६८२ हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात साधारणत: कापूस, सोयाबीन व धान या प्रमुख पिकांची लागवड केली जाते. जिल्ह्यात सर्वाधिक १ लाख ७७ हजार ६८ हेक्टरवर धानाची लागवड होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यापाठोपाठ कापूस १ लाख ३४ हजार ८२७ हेक्टर व सर्वात कमी सोयाबीन १ लाख १८ हजार हेक्टर, असे लागवड क्षेत्र आहे. मागील वर्षी कापसाने दगा दिल्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंत दर्शविली होती. मात्र यावेळी नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाची लागवड वाढणार आहे, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. बियाणे व खतांचे आवंटन मंजूर करून घेतले आहे. यावर्षी खरीप हंगामात भात, ज्वारी, तृणधान्य, तूर, मूग, उडीद, कडधान्य, अन्नधान्य, भुईमूग, तीळ, सोयाबीन, एरंडी, गळीतधान्य, कापूस, ऊस पीक पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. ऐनवेळी शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाने खते मागविली आहेत. खताची एक खेप जिल्ह्यात उपलब्धही झाल्याची माहिती आहे. एकूणच हंगामपूर्वीची सर्व कामे आता आटोपली आहेत. आता बळीराजा केवळ पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मागील दोन-चार दिवसांपासून वातावरणातही फरक पडला आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होते. जिल्ह्यात दोन-तीनदा मान्सूनपूर्व पावसाने हजेरीही लावली आहे. मात्र हा पाऊस किरकोळ स्वरुपाचा होता. आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)अंदाज चुकेल का, अशी भीती हवामान खात्याने यावर्षी सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडेल, व मान्सून वेळेवर दाखल होईल असा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे शेतकरी सुखावला होता. मात्र मान्सूनचे आगमन लांबणीवर गेले. आता शनिवारी पुन्हा पुणे येथील हवामान खात्याने मान्सून विदर्भात दाखल झाल्याचे म्हटले आहे. २४ तासात विदर्भात मुसळधार पाऊस पडेल, असाही अंदाज होता. मात्र जिल्ह्यात रविवारी दिवसभर पाऊस आला नाही. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज चुकेल काय, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. खताच्या लिंकिंगची शक्यताखरीप हंगामात कृषी केंद्रधारकांकडून बी-बियाणे व खतांचा तुटवडा दाखवून अधिकच्या भावाने खत व बियाणांची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. यासोबतच खताची लिंकिंगही केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यात कृषी विभागाने पथके गठित केलीदरपत्रक लावणे आवश्यककृषी केंद्रधारकांनी आपापल्या केंद्रात खत व बियाणांचे दरपत्रक लावणे आवश्यक आहे. दरपत्रक लावले आहे किंवा नाही, हे तपासण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांना सूचित करण्यात यावे, अशी मागणी आहे. यासोबतच केंद्रधारकांनी त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकची माहितीही दरपत्रकात नमूद करणे अनिवार्य आहे.