शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाकडे बंदिस्त पोपटाला मुक्तीची प्रतीक्षा

By admin | Updated: August 24, 2015 01:05 IST

शेजारी राहणाऱ्या एका महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतलेला पोपट सध्या वन विभागाच्या पिंजऱ्यात बंद आहे.

वन अधिकारी पेचात : पोपट उलगडेना मनातील गुपित बी.यू.बोर्डेवार  राजुराशेजारी राहणाऱ्या एका महिलेला अश्लील शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली राजुरा पोलिसांनी ताब्यात घेतलेला पोपट सध्या वन विभागाच्या पिंजऱ्यात बंद आहे. रानोमाळ मुक्तपणे विहार करण्याचे त्याचे स्वप्न यामुळे धुळीस मिळाले आहे. मानव जातीच्या दोन घटकांमधील अंतर्गत वादातून बंदीवास भोगावा लागलेल्या या पोपटाला आता मुक्तीची आस लागली आहे. दोन वर्षापूर्वीची गोष्ट असावी. राजीव गांधी वॉर्डातील भाऊराव वाटेकर यांच्या घराच्या अंगणात एक पोपट जखमी अवस्थेत पडून होता. या कुटुंबाने त्याला उचलून घरात घेतले. पाणी पाजले. त्या पोपटाची सुश्रूषा करून दोन-तीन वेळा त्याला उडविण्याचा प्रयत्न केला. परंतु हा पोपट उडू शकत नव्हता. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने त्या पोपटाला पिंजऱ्यात ठेवून त्याची देखभाल केली, पोपटाला घरच्या सदस्यासारखी वागणूक देऊन त्याचा सांभाळ केला.येथील भाऊराव वाटेकर अतिशय साधी व्यक्ती आहे. त्याचे भारत चौकात सलूनचे दुकान आहे. तथापि, सध्या पोपटावर जिवापाड प्रेम करणारा भाऊराव पोपट बंदिस्त असल्यामुळे हतबल झाले आहेत. ‘लोकमत’शी बोलताना भाऊराव म्हणाले, पोपट कसा शिवीगाळ करणार, खोटी तक्रार करून आमच्या कुटुंबाची बदनामी केली जात आहे. राजुरा पोलिसात कुठलाच आरोप सिद्ध झाला नसला तरी अद्याप पोपटाला आमच्या ताब्यात देण्यात आले नाही. एखादा मरणासन्न अवस्थेत पडलेल्या पशुला वाचविणे हा काय गुन्हा आहे, अशा त्याचा सवाल आहे. पोपट अपशब्द बोलतो हे कोर्टात कसे सिद्ध होणार, हे लक्षात येताच राजुराचे ठाणेदार प्रमोद डोंगरे यांनी हे प्रकरण राजुराचे वनपरिक्षेत्र अधिकारी याचेकडे सुपूर्द केले. वनअधिकाऱ्यांनी या पोपटाला वन विभागाच्या कोठडीत ठेवले. या बंदिस्त पोपटाला उंच भरारी मिळणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजुरातील शिवीगाळ करणारा पोपट कधीच शिवीगाळ करीत नसून आपसी वैमनस्यामुळे ही तक्रार दिल्या गेल्याचा आरोप भाऊराव वाटेकर यांनी केला आहे. राजुरा शहरात नवनवीन प्रकरण पुढे येत असले तरी वादग्रस्त पोपटाने पोलिसांपुढे सभ्यतेचे दर्शन दिल्यामुळे तक्रार करणाऱ्यांची हेतू अयशस्वी ठरला आहे.राजुरा शहरात सध्या पोपट प्रकरणाची चर्चा सुरू असून यापूर्वी या महिलेने राजुरा पोलीस ठाण्यात मुलाने खोटी कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणाची मात्र पोलीस यंत्रणेने कुठलीच चौकशी केली नाही आणि पोपटाचे प्रकरण येताच मात्र तत्परता दाखविण्याचा प्रयत्न केला गेला.वनविभागाच्या कोठडीत असलेल्या पोपटाचा गुन्हा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभाग या विषयात कोणताच ठोस निर्णय घेत नसल्याने तूर्तास पोपट प्रकरण प्रलंबीत आहे.