शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘त्या’ कारवाईसाठी मनपाला मुहुर्ताची प्रतीक्षा

By admin | Updated: February 13, 2015 01:30 IST

चंद्रपुरातील अवैध बांधकामाचा विषय आणि आयुक्त सुधीर शंभरकर यांची याविषयीची सडेतोड भूमिका, यामुळे मनपासोबत शहरातच चांगलेच वादळ उठले.

चंद्रपूर : चंद्रपुरातील अवैध बांधकामाचा विषय आणि आयुक्त सुधीर शंभरकर यांची याविषयीची सडेतोड भूमिका, यामुळे मनपासोबत शहरातच चांगलेच वादळ उठले. शहरातील नियमबाह्य कामे पडली जाऊन शहर सुटसुटीत होईल, अशी आशा चंद्रपूरकरांना होती. मात्र दोन महिन्यात कारवाई करण्याची घोषणा झाल्याला आता दीड महिना लोटला आहे. आता येत्या १५ दिवसात मनपा प्रशासनाला कोणता मुहुर्त हवा, असा उरफाटा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे करण्यात आली आहे. मंजूर नकाशा वेगळा आणि प्रत्यक्षात बांधकाम वेगळे, असा प्रकार मागील अनेक वर्षांपासून चंद्रपुरात बिनबोभाटपणे सुरू होता. हा सर्व प्रकार तेव्हाच नगरपालिकेला माहीत नसावा, असे नाही. मात्र या प्रकाराकडे तत्कालीन नगरपालिकेने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. त्यामुळे अशी कामे चंद्रपुरात बऱ्यापैकी करण्यात आली. मात्र आता या अवैध बांधकामामुळे शहरात समस्या निर्माण होऊ लागल्यानंतर आणि नागरिकांची ओरड होऊ लागल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग आली. विशेष म्हणजे, ३० डिसेंबर २०१४ रोजी मनपाच्या सभागृहात झालेल्या आमसभेत नगरसेवकांनी अवैध बांधकामाचा विषय उचलून धरला होता. यापूर्वी नगरसेविका सुनिता लोढिया यांनी मनपाकडे तक्रारही दाखल केली होती. आमसभेत काही नगरसेवकांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त सुधीर शंभरकर यांनी दोन महिन्यात अवैध बांधकामविरुध्द कारवाई केली जाईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे सभागृह तेव्हा शांत झाले होते. आमसभेतील ही घोषणा प्रसार माध्यमाद्वारे लोकांपर्यंत आल्यानंतर चंद्रपूरकरांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. चंद्रपूरचे महानगर होण्याच्या दृष्टीने हे पहिले आणि अत्यंत मोलाचे पाऊल ठरेल, असे वाटले होते. महानगरपालिका प्रशासनाने या कारवाईचा पहिला टप्पा ठरवित शहरातील २६ अवैध बांधकामाची यादी तयार केली. ही २६ बांधकामे टार्गेट ठेवून कालबध्द कार्यक्रम आखला होता. दरम्यानच्या काळात काही पदाधिकाऱ्यांकडून या कारवाईला विरोध करणे सुरू झाले. काही इमारतधारकांनी राजकीय शक्तीचाही आधार घेतला. त्यामुळे या कारवाईत पाहिजे तशी गती अजूनही आलेली दिसत नाही. आयुक्तांनी केलेल्या घोषणेला आता दीड महिन्याचा काळ लोटत चालला आहे. संबंधित बांधकामधारकांना नोटीस पाठविण्यापलिकडे मनपा प्रशासनाने कोणतीही कार्यवाही पुढे रेटलेली दिसत नाही. घोषणेवर विश्वास ठेवला तर आता प्रत्यक्ष कारवाईसाठी केवळ १५-२० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या दिवसात मनपा प्रशासन कोणता मुहुर्त साधणार वा त्या प्रतीक्षेत आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)