शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना नोकरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी ...

अतिक्रमणामुळे नागरिक त्रस्त

चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

अनियंत्रित वाहनांवर कारवाई करावी

चंद्रपूर : पठाणपुरा, नागपूररोड, बल्लारपूररोड, तुकूम, दुर्गापूर परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्तळ असते. विशेषत: नियमानुसार वाहन चालविता वाट्टेत तसे वाहन पळविले जाते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. एवढेच नाही तर रस्त्याच्या वळणावर वाहनाचा वेग कमी करीत नाहीत. शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशा वाहनांना आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

आयुक्तालय कार्यालय निर्माण करा

चंद्रपूर : चंद्रपूर शहरात महापालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या व नगर विस्तार झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अन्य शहराच्या धर्तीवर चंद्रपूर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण झाल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा कामाचा ताण कमी होण्यास मदत होईल.

गंजवार्ड परिसरात दुर्गंधी

चंद्रपूर : येथील भाजीबाजार असलेल्या गंजवार्ड परिसरातील रामाळा तलावाशेजारील चौकामध्ये कचरा टाकत असल्याने रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागणार आहे. महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नियमित कचरा साफ करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

चंद्रपूर : शासनातील विविध विभागांमध्ये नोकर भरतीवर बंद असल्याने युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला. कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाली आहे.

पडोली चौकातील अतिक्रमण हटवा

चंद्रपूर : नागपूर-चंद्रपूर मुख्य मार्गावर असलेल्या पडोली चौकात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. हा चौक सतत गजबजलेला असतो. त्यामुळे या चौकातील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

दुर्गापूर मार्गावर गतिरोधकाची मागणी

चंद्रपूर : चंद्रपूर ते दुर्गापूर मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु बऱ्याच ठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. सकाळी व सायंकाळी या मार्गावर विद्यार्थ्यांची गर्दी असते. संभाव्य धोका टाळण्यासाठी गतिरोधक निर्माण करण्याची मागणी नागरिकांनी केली.

शहरात स्वच्छता मोहीम राबवावी

चंद्रपूर : शहरातील काही वाॅर्डामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही नागरिक रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्रकारही बंद करण्यासाठी मनपाने निर्देश द्यावे. या परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

तुळशीनगरातील विरंगुळा केंद्र सुरू करावे

चंद्रपूर : तुळशीनगर परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी जागा आरंक्षित करण्यात आली आहे. मात्र या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्यामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे या केंदात सुविधा पुरवून केंद्र अद्ययावत करावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.

प्रशासकांना मानधनाची प्रतीक्षा

चंद्रपूर : जिल्ह्यातील सप्टेंबर तसेच ऑक्टोबर महिन्यात ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला अशा ग्रामपंचायतीवर प्रशासनाने प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, ग्रामपंचायतची निवडणूक झाली असून, सरपंचाची निवड सुद्धा करण्यात आली आहे. मात्र अद्यापही प्रशासकांना मानधनच मिळाले नसल्याने त्यांच्यात संताप व्यक्त केला जात आहे.