शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

भदगा नाला प्रकल्पाला वन जमिनीची प्रतीक्षा

By admin | Updated: December 2, 2014 23:02 IST

चिमूर तालुक्यातील १४७० हेक्टर क्षेत्र सिंचीत करणारा भदगा नाला लघु प्रकल्प वनजमीन प्रस्तावाच्या मान्यतेसाठी रखडला आहे. १९८३ ला १६३.३० लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची

संपूर्ण क्षेत्र बफर झोनमध्ये : वनप्रस्ताव मान्यतेअभावी सर्वच कामे बंदमंगेश भांडेकर - चंद्रपूरचिमूर तालुक्यातील १४७० हेक्टर क्षेत्र सिंचीत करणारा भदगा नाला लघु प्रकल्प वनजमीन प्रस्तावाच्या मान्यतेसाठी रखडला आहे. १९८३ ला १६३.३० लक्ष रुपयाची प्रशासकीय मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाची अद्यावत किमंत आजच्या स्थितीत ६७३५.१४ लक्ष रुपयांवर पोहचली आहे. मात्र, वनजमीन संदर्भात तोडगा निघत नसल्याने हा प्रकल्प गेल्या ३० वर्षांपासून रखडलेला आहे. चिमूर तालुक्यातील तळोधी (नाईक) या गावाजवळील नाल्यावर मोठा भदगा नाला लघु प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी ३३०.४८ हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. यामध्ये २९९.२७ हेक्टर वनजमीन, १.७१ हेक्टर राजस्व जमीन व २९.५० हेक्टर खाजगी जमीनीची आवश्यकता आहे. मात्र, वनप्रस्तावास अंतीम मान्यता न मिळाल्याने भूसंपादनाची कारवाई थंडबस्त्यात आहे. या प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र १४७० हेक्टर असून सिंचन क्षमता १७७० हेक्टर आहे. या प्रकल्पामुळे २९९.२७ हेक्टर वनजमीन बाधीत होत असल्याने वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत वनप्रस्ताव मान्यतेअभावी प्रकल्पाची सर्व कामे बंद आहेत. प्रकल्पाच्या वनप्रस्तावअंतर्गत पर्यायी वनीकरणाकरीता ६२३.९२ हेक्टर झुडपी जंगल क्षेत्र चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन दिले होते. यापैकी ५९८.५४ हेक्टर क्षेत्र (वनक्षेत्राच्या दुप्पट क्षेत्र) पर्यायी वनीकरणाकरीता योग्य असल्याचे प्रमाणपत्र वनविभागाकडून प्राप्त झाले होते. परंतु, त्यानंतर २१.५४ हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विभागीय कार्यालय व मंडळ कार्यालयाने २०१३ मध्ये पत्रव्यवहार करुन प्रकल्पाकरीता आवश्यक जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी अद्यापही या प्रकल्पाच्या पर्यायी वनीकरणाकरीता झुडपी जंगल उपलब्ध करुन दिलेले नाही. या प्रकल्पाच्या बुडीतखालील संपुर्ण क्षेत्र व कालव्याखालील ४ गावांचे संपुर्ण क्षेत्र बफर झोनमध्ये समाविष्ठ आहे. त्यामुळे वनप्रस्ताव संदर्भात वरिष्ठ स्तरावरुन निर्णय झालेला नाही. गेल्या तीस वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला असल्याने परिसरातील नागरिकांनाही आपल्या भागात सिंचन प्रकल्प होणार असल्याची कोणतीही माहिती नसल्याची स्थिती आहे.