शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मदतीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 01:11 IST

गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले.

वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान : खरिप हंगाम तोंडावरब्रह्मपुरी : गत खरिप व रबी हंगामात वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. वनविभागाने या नुकसानीचे सर्व्हेक्षण केले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही वन्यप्राण्यांकडून नुकसान झालेले शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही मतद तातडीने वाटप करण्याची मागणी आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव वनपरिक्षेत्रांतर्गत आवळगाव, वांद्रा, हळदा, कोसंबी ही गावे येतात. या गावालगतच जंगल क्षेत्र आहे. त्यामुळे चितळ, हरिण, सांभर, रानडुकर या वन्यप्राण्यांचा नेहमीचा परिसरात वावर असतो. जंगलालगत शेतजमीन असल्याने वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करतात. रबी हंगाम रानडुकरांचे कळप सर्व शेतच फक्त करतात. तसेच गावात शेतातील जनावरांवर हल्ले करून ठार करतात. अशा नुकसानग्रस्तांना वनविभागाकडून आर्थिक मदत दिली जाते. नुकसान झालेल्या शेतीचे वनकर्मचाऱ्यांची पंचनामे केले होते. पंचनामे केल्यानंतर काही दिवसात मदत मिळेल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सांगण्यात आले होते. मात्र चार- पाच महिने लोटूनही अद्यापही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. शासनाकडून निधी आला नसल्याची चर्चा सुरू असल्ी तरी खरिपाचा हंगाम सुरू झाला आहे. त्याच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. पैशाची आता गरज आहे. मात्र मदत मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)