शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा नदीचे पात्र कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:26 IST

मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देबॅरेजमुळे नदी आटली : ३१ गावांचा पाणी पुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून तालुक्यातील ३१ गावांकरिता महाराष्ट्र जीवन प्राधीकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. या तीनही योजनेचे मुख्य केंद्र गडीसुर्ला असून तीनही योजनांना हरणघाट वैनगंगा नदीपात्रातून पाणी पुरवठा होतो. या नदी किनाऱ्यावर स्वतंत्र्य पाण्याची टाकी उभारल्या जात आहेत. या माध्यमातून ३१ गावांना पाणी पुरवठा होतो. मात्र यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने वैनगंगा दुथडी भरून वाहू शकली नाही. सध्या या नदीचे पात्र कोरडे पडले आहे. परिणामी ग्रामीण पाणी पुरवठा प्रभावित होऊन जलसंकट निर्माण झाले आहे.पंधरा दिवसांपूर्वी प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने पाट काढून पाण्याचा मार्ग टाकीपर्यंत काढला. मात्र तोही आटत आल्याने पाणी समस्या उग्ररूप धारण करणार असून हजारो कुटुंबीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.महाराष्ट्र जीवन प्राधीकरणतर्फे लाखो रूपये खर्च करून १९ गावांकरिता बोरचांदली, आठ गावांकरिता बेंबाळ, पाच गावांकरिता टेकाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना पंधरा वर्षांपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.याच नदिपात्रातून मूल शहरालाही पाणी पुरवठा होतो. या योजनांच्या माध्यमातून ३१ गावांची तहान भागत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनांना पाणी कमी पडत असून महिलांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही आहे. परिणामत: पाणी समस्या गंभीर होत असून महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सावली तालुक्यातील लोंढोली गावाजवळ वैनगंगा नदीवर पाच वर्षापासून लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून यात पाणी साठवणूक सुरू आहे. त्यामुळे बॅरेजच्या खालील वैनगंगेचे पात्र पूर्णत: कोरडे पडले आहे.वैनगंगेच्या नदीपात्रावर जि.प.च्या जवळपास दहा ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यांना पाण्याचा तुटवडा निर्माण होऊन पाणी समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे.जीवन प्राधिकरणाची पाईपलाईन खिळखिळीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावांकरिता असलेल्या योजनेची पाईप लाईन १५ वर्षे जुनी आहे. ही पाईपलाईन गंजून खिळखिळी झाली आहे. ठिकठिकाणी छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण वाढले असून हजारो लिटर पाणी बारमाही वाया जाते. ही बाब संबंधित कंत्राटदाराने प्रशासनाला वारंवार कळविली. मात्र प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.वैनगंगा नदीवर बंधाऱ्याचे काम झाल्याने नदी कोरडी होत आहे. त्यामुळे मूल तालुक्यातील तिन्ही योजनांना पाणी कमी पडत आहे. त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होत असून पाणी मे महिन्यापर्यंत केबसे पुरेल, यासाठी नियोजन केले जात आहे.- कोटनाके, शाखा अभियंताग्रामीण पाणी पूरवठा, जि.प. चंद्रपूर