शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर वाघोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:13 IST

सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला.

ठळक मुद्देरस्त्यावरच ठाण : नागरिकांनी पिटाळून लावल्यानंतर रस्ता झाला मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्कगेवरा : सध्या जिल्ह्यात वन्यजीव व मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे, बिबट्यांचे हल्ले होत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावातील जनजीवन विस्कळीत होत आहे. अशातच आज शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावर वाघ ठाण मांडून बसला. यामुळे विद्यार्थ्यांची पाचावर धारणच बसली. मात्र काही वेळानंतर तिथे काही नागरिक जमा झाले. त्यांनी वाघाला पिटाळून लावले. त्यानंतर विद्यार्थी व नागरिक त्या रस्त्याने पुढे जाऊ शकले.सावली वनपरिक्षेत्रात वाघ आणि बिबटासह हिंस्र पशुंचा वावर आहे. आता हे प्राणी मानवीे वस्त्यांकडे येऊ लागले आहेत. गेवरा- मेहा बिटातील बारसागड, निफंद्रा, डोंगरगाव, गेवरा बुज, करोटी, आकापूर, खानाबाद या गावातील शेतकरी, नागरिकांना सध्या गाव शिवारातून पट्टेदार वाघीण फिरताना दिसून येत आहे. कराली जंगलात गेवरा येथील एका शेतकऱ्यांच्या बैलबंडीवर वाघाने हल्ला चढविला.मात्र अन्य शेतकºयांच्या प्रसंगवधनाने बैलासह शेतकरी बचावला. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी बारसागड येथील शालेय विद्यार्थी निफंद्रा हायस्कूलमधून परत येत असताना सिंगोबाच्या डोंगर पायथ्यालगतच्या रस्त्यावरुन वाघ ठाण मांडून बसला होता. त्यामुळे विद्यार्थी तिथेच थांबले. त्यानंतर ते घाबरुन माघारी वळले. काही वेळाने नागरिकही तिथे आले. सर्वांनी मिळून वाघाला रस्त्यावरून पिटाळून लावले.मागील आठवड्यापासून बारसागड, गेवरा बुज, निफंद्रा परिसरात पट्टेदार वाघ व दुसरीकडे दोन पिलांसह वाघीण गावशिवारातून फिरत असल्याने शेतकºयात दहशत आहे. शेतीची कामे सायंकाळच्या आत आटोपून घरी परतत आहेत. रस्त्यावर वाघ दिसल्याची माहिती सावली वनविभागाला देण्यात आली. वनकर्मचारी परिसरात लक्ष ठेवून आहे.दोन बछड्यासह फिरत आहे वाघीणबारसागड परिसरात दोन बछड्यासह वाघीण फिरत आहे. वाघीण सध्या बछड्यांना सोडण्याच्या परिस्थितीत असल्याने तिचा वावर झुडपी जंगल परिसरात वाढला आहे. वाघांच्या प्रत्येक हालचालीवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. अनुचित प्रकार घडू नये, याबाबत नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धाडे यांनी लोकमतशी बोलताना केले.वाघाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठारचिंधिचक (बुज.): नागभीड वनपरिक्षेत्रातील जनकापूर येथे गावात वाघाची दहशत सुरु असून गुरुवार सकाळी वाघाने श्यामराव कोरेवार यांच्या मालकीच्या दोन शेळ्या ठार केल्या. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पुन्हा वाघाने शेळ्यावर हल्ला केला. परंतु दिवसाची वेळ असल्यामुळे नागरिक धावले व वाघ झुडपी जंगलात पसार झाला.