शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगाची शासकीय दरानुसार मजुरी द्या

By admin | Updated: August 6, 2015 01:59 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मनरेगात काम करणाऱ्या शंभरच्या वर मजुरांना काम करुनही कामाच्या हजेरी बुकातून ...

शिवसेनेची मागणी : आंदोलनाचा इशाराब्रह्मपुरी: ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मनरेगात काम करणाऱ्या शंभरच्या वर मजुरांना काम करुनही कामाच्या हजेरी बुकातून मजुरावर राजकीय पक्षाचा चिन्ह लावून हेतूपूरस्पर डावलले. तसेच कित्येकांना शासन स्तरावर मिळणाऱ्या मजुरी दरात दरानुसार मजुरी न काढता आपला मनमानीचा कळस गाठून अल्पदराची मजुरी काढल्याने मनरेगात काम करणाऱ्या मजुरांनी रोष व्यक्त केला आहे. येत्या दोन आठवड्यात मजुरांना न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन व उपोषण करण्याचा इशारा शिवसेना तालुका प्रमुख प्रा. अमृत नखाते यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.पिंपळगाव (भो.) येथील ग्रामपंचायत प्रशासनाने मनरेगात केलेल्या भ्रष्टाचारात सहभागी सरपंच, ग्रामसेवक व तांत्रीक सहायकाला बाजूला ठेवून ग्रामरोजगार सेवक व त्याचा सहाय्यक याच्यावर कारवाई करण्यासाठी गट विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांच्या मार्फत शर्तीचे प्रयत्न चालविले असल्याचे स्थानिक नागरिकांच्या चर्चेवरुन दिसून येत आहे. सदर भ्रष्टाचारात सरपंच हेमंत खोब्रागडे, सचिव नानाजी मेश्राम, तांत्रिक सहायक बळीराम मैंद, रोजगार सेवक दिलीप उरकुडे, रोजगार सेवक सहायक तुळशिदास उरकुडे आदींचा समावेश असल्याचा आरोप शिवेसेनेचे तालुका प्रमुख अमृत नखाते यांनी केला आहे. या नियोजनबद्ध मनरेगाच्या कामात लाखो रुपयांचा डल्ला मारून तो आपल्या घशात कसा उतरवायचा, याची रितसर तालीम या भ्रष्टाचाऱ्यांना एका शिकवणी वर्गातून दिली असल्याची चर्चा असून त्या सर्व पैशाची विल्हेवाट ग्रामपंचायत निवडणुकीवर करण्यासाठी नियोजन झाल्याचा आरोपही आहे. दरम्यान, या प्रकरणात कोणाचीही दया केली जाणार नाही, असे उपविभागीय अधिकारी सीमा अहीरे यांनी स्पष्ट केले आहे. (तालुका प्रतिनिधी)