शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांना मदत करण्याचे वडेट्टीवारांचे आश्वासन

By admin | Updated: April 8, 2017 00:51 IST

गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे भरती असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील रुग्णांची विचारपूस करुन ....

शस्त्रक्रिया करणार : रुग्णालयात भेटचंद्रपूर : गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे भरती असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील रुग्णांची विचारपूस करुन सावली तालुक्यातील पारडी येथील हिराचंद परशुराम पुडके या रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला नागपूरला हलविण्याचे निर्देश आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. तसेच त्या रुग्णाचा शस्त्रक्रियेचा खर्चही उचलण्याचे आश्वासन वडेट्टीवारांनी यावेळी दिले.सावली तालुक्यातील पारडी येथील रुग्ण हिराचंद परशुराम पुडके, व्याहाड येथील भैयाजी भोयर व ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील रोशन गोविंदा नदेश्वर या तिन्ही रुग्णांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेला हिराचंद पुडके हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याच्या मागे म्हातारे आई वडील, पत्नी व एक दोन वर्षाची मुलगी आहे, त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत असून फॅक्चर आहे. समोरच्या उपचार घेण्याची त्यांची परिस्थिती नाही. अशावेळी आमदार वडेट्टीवार यांनी समोर येऊन हिराचंदच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिल्याने त्याच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील रोशन गोविंदा नंदेश्वर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचीसुद्धा भेट घेऊन उपचार सुरु करण्याचे आदेश दिले. गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे रुग्णांना वेळेवर हवे ते उपचार मिळत नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे ही समस्या उद्भवत असल्याने ही समस्या दूर करण्यासाठी आरोग्यमंत्र्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार वडेट्टीवार यांनी दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते, डॉ. रुडे, युवक काँग्रेसचे लोकसभा सचिव कुणाल पेंदोरकर, सतीश नंदगीरवार, मंगेश दिवटे, खरपुंडीचे सरपंच कमलेश खोब्रागडे, स्नेहल संतोषवार, दीपक गद्देवार, सुरेश मशाखेत्री व सावली तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनधी)