शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

आज मतदान; प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून गुरूवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

चोख पोलीस बंदोबस्त : मतदार, उमेदवार व कार्यकर्त्यांच्या हालचालींवर नजरचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून गुरूवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीसाठी पोलीस विभागाने जिल्हाभरात चोख पोलीस बंदोबस्त लावला असून उमेदवार, कार्यकर्ते व मतदारांच्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ३१५ उमेदवार तर पंचायत समित्यांच्या ११२ जागांसाठी ५१९ उमेदवार रिंगणात आहेत. गुरूवारला पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यात १ हजार ४५० मतदान केंद्र निश्चीत करण्यात आले आहेत. यात नक्षलग्रस्त संवेदनशिल म्हणून ६३ मतदान केंद्र तर १७८ मतदान केंद्र संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर १३० क्षेत्रीय अधिकारी, १५९६ मतदान केंद्राध्यक्ष व ६ हजार ३७५ मतदान अधिकारी कार्यरत राहणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात ११ लाख ५७ हजार ७५४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यात ६ लाख १ हजार ८६६ पुरूष मतदार तर ५ लाख ५५ हजार ८८७ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रावर साहित्य पोहोचविणे व कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी ३५८ वाहने आरक्षित करण्यात आली होती. मतदानाचे सर्व साहित्य केंद्रावर पोहोचले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)दारू तस्करांवर लक्षनिवडणूक शांततेत पार पडुन कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलिसांनी नियोजन पूर्ण केले असून दारूबंदी जिल्हा असल्या कारणाने दारूच्या बाबतीत पोलीस प्रशासन विविध मोहीमेद्वारे कठोर पाऊले उचलली आहेत. निवडणुकीपुर्वीच १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात दारूच्या ३७९ गुन्हे नोंद करून ४४० आरोपीसह ६९ वाहने जप्त केली. यात एकुण २ कोटी ४१ लाख १२ हजार ७७३ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.२ हजार ११५ जवानांचा अतिरिक्त ताफानिवडणूक बंदोबस्तासाठी जिल्हा पोलीस दलाचे ३ हजार २७१ पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून विविध ठिकाणी एसएसटी पॉईन्ट स्ट्रायकिंग फोर्स आणि पेट्रोलिंग पार्टी तयार करण्यात आल्या आहे. तसेच बंदोबस्तासाठी बाहेरून मागविण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये १५ अधिकारी, एसआरपीएफचे ३ प्लाटुन (९० कर्मचारी व १० अधिकारी), पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला व नागपूर येथून ५५० कर्मचारी, तसेच अकोला व नागपूर मुख्यालय येथून २०० पुरुष कर्मचारी, होमगार्ड ९०० व वायरलेस विभागाचे ८० कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. या व्यतिरिक्त वनविभागाचे २० कर्मचारी व सिक्युरीटी विभागाचे २५० कर्मचारी असा २ हजार ११५ कर्मचाऱ्यांचा ताफा सुरक्षेसाठी बंदोबस्तात आहे.पोलीस मित्रांचीही मदत पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्तामध्ये ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, २३ पोलीस निरीक्षक व १४५ सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक हे बंदोबस्त अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. तसेच बंदोबस्तामध्ये जिल्ह्यात कार्यरत असलेल्या दोन हजार पोलीस मित्रांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. विविध पेट्रोलिंग पथकाद्वारे सर्व जिल्हाभर पेट्रोलिंग राबविण्यात येणार आहे. याकरीता १६५ सरकारी व खाजगी वाहनांचा उपयोग करण्यात येणार आहे.जिल्ह्यात ३७ (१) व (३) कलम लागूचंद्रपूर : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राहण्याचे दृष्टीने चंद्रपूरचे जिल्हादंडाधिकारी आशुतोष सलील यांनी सर्व तालुक्यामध्ये कलम ३७ (१) व (३) जारी केले आहे. हे आदेश १४ फेबुवारीच्या मध्यरात्री पासून लागू झाली असून २८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पर्यंत अमलांत राहील. या अवधीमध्ये पाच किंवा अधिक व्यक्ति एकत्र येण्यावर तसेच जीवितास इजा होईल, अशी वस्तू स्वत: जवळ बाळगण्यावर कलमान्वये बंदी घालण्यात आली आहे.