शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी शातंतेत मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 23:31 IST

जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले.

ठळक मुद्देआज निकाल : उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्ह्यातील चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर २३ ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. सर्व उमेदवारांचे भाग्य मशिन बंद झाले असून बुधवारी निकाल घोषित होणार आहे.बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे, लावारी व मानोरा येथील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झाले. लावारी येथे ८१.९७, नांदगाव पोडे येथे ७२.१० तर मानोरा येथे ७८.४३ टक्के मतदान झाले. वरोरा तालुक्यातील सोईट, भटाळा, वनोजा येथे पोटनिवडणूक तर येन्सा व अर्जुनी येथे सार्वत्रिक निवडणुकीसाठी सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले.राजुरा तालुक्यातील गोवरी येथील वॉर्ड नं. २ साठी पोटनिवडणूक झाली. येथे ८७.७७ टक्के मतदान झाले तर सास्ती येथील ११ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. येथे ३८ उमेदवार सदस्यपदासाठी तर सात उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात होते. रात्री उशीरापर्यंत मतदान चालले. त्यामुळे येथील मतदानाची टक्केवारी मिळू शकली नाही. तर चुनाळा येथील पोटनिवडणुकीसाठी ८५.८६ टक्के, पाचगाव येथे ८० टक्के तर डोंगरगाव येथे ७८ टक्के मतदान झाले.चिमूर तालुक्यातील भिसी येथील वॉर्ड नं. २ मधील एका जागेसाठी ७२.३३ टक्के तर कोरपना तालुक्यातील नारंडा येथील पोटनिवडणुकीसाठी ७९.७२ व शेरज (बु) येथे ६७.९८ टक्के मतदान झाले. जिवती तालुक्यातील शेडवाही ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ८४.८० टक्के मतदान झाले. मूल तालुक्यातील चिरोलीच्या वॉर्ड नं. २ च्या पोटनिवडणुकीत ७२.३३ टक्के मतदान झाले. निवडणुकी दरम्यान मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बुधवारी मतमोजणी होवून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे रिंगणात उभे असलेल्या उमेदवारांची धडधड वाढली आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात एकही नामांकन नाहीब्रह्मपुरी : तालुक्यातील मरारमेंढा, किटाळी, बरडकिन्ही व चौगान या चार ग्रामपंचायतीमध्ये सहा जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. मात्र चारही ग्रामपंचायतीमधून एकही नामनिर्देशन पत्र न आल्याने येथे मतदान घेण्यात आले नाही.