शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमिषाची आॅफर !

By admin | Updated: October 9, 2015 01:48 IST

नवरात्र, दसरा व दिवाळी सणासाठी विक्रेत्यांकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी व त्यांना भुरळ पाडण्यासाठी ‘आॅफर’ जाहीर करण्यात येते.

राजकुमार चुनारकर खडसंगीनवरात्र, दसरा व दिवाळी सणासाठी विक्रेत्यांकडून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी व त्यांना भुरळ पाडण्यासाठी ‘आॅफर’ जाहीर करण्यात येते. त्यामध्ये एखाद्या वस्तूवर १० ते २० टक्के पर्यंत डिस्काऊंट, लक्की ड्रा कुपन, एक पे एक फ्रि, हमखास भेटवस्तू आदी उपाय दुकानदाराकडून करण्यात येतात. अशाच स्वरूपाच्या काही आॅफर नगरपरिषद निवडणुकीसाठी चिमूर शहरातील मतदारांना काही उमेदवाराकडून मिळण्याची शक्यता आतापासूनच देण्याचे उमेदवाराच्या पाठीराख्याकडून बोलून दाखवली जावू लागली आहे. त्यामुळे नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत मतदारांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत.कोणतीही निवडणूक म्हटले की काही कार्यकर्त्यांसाठी पर्वनीय ठरत असते. तर उमेदवारही मिळेल ती संधी साधुन आपल्या मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतात. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ८ आॅक्टोबरला संपली. १४ आॅक्टोबरला घटस्थापना व नवरात्रोत्सवाला सुरूवात होत असल्यामुळे या दिवसांपासून प्रचाराला जोर येणार आहे. प्रचार करताना मतदाराला आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी उमेदवाराकडून देवीदर्शन सहलीचे आमीषही महिला मतदारांना दाखवले जाण्याची शक्यता आहे.येत्या २२ आॅक्टोबरला विजयादशमी या दिवशी सर्वसामान्य पुजा करून आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना देतात. मात्र मतदार या दसऱ्याचे औचित्य साधून मतदाराच्या घरापर्यंत पोहचून आपट्याच्या पानांऐवजी अर्धा एक किलोचा मिठाई पॉकेट किंवा दुसरे काही पोहचवण्याचीही शक्यता येथील राजकीय वातावरण तापले असून काही मागच्या निवडणुकांच्या अनुभवावरून येथे असा प्रकार घडण्याची शक्यता आहे. दसरा सण झाल्यानंतर दहा दिवसांनी दिवाळीचा सण येणार आहे. दिवाळीची तयाारी बहुतेकांच्या घरात दहा पंधरा दिवसांपासूनच सुरू असते. मात्र चिमूर नगर परिषदेसाठी मतदान १ नोव्हेंबरला आहे. त्यामुळे दिवाळीत फराळाच्या साहित्याचे एक-दोन हजार रुपयाचे कुपन उमेदवाराकडून देण्याचा प्रयत्नही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, निवडणूक ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर आल्याने आताच दोन्ही सणाच्या खर्चाची चिंता नाही, अशाही प्रतिक्रिया काही नागरिकांकडून येवू लागल्या आहेत. यावर्षीच्या हंगामात पाहिजे त्या प्रमाणात जिल्ह्यात व तालुक्यात पाऊस पडला नाही आणि पावसाची झड मुद्दामच दिसली नाही. मात्र नगर परिषद निवडणुकामुळे उमेदवारांकडून मतदारावर आॅफरचा पाऊस मात्र नक्कीच पडणार आहे, हे सांगायला कुण्या ज्योतीष्यवाल्या बाबाची गरज नाही, हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत सणासुदीच्या दिवसात मतदारांना आमीषाची आॅफर येवून मतदारांचे काही प्रमाणात अच्छे दिन येणार आहेत.