शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल-रुखमाई पालखीची शोभायात्रा

By admin | Updated: July 30, 2015 01:00 IST

आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमेटी किल्ला वार्ड भद्रावतीतर्फे मंगळवारी विठ्ठल रुखमाई पालखीच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

भद्रावती नगरी दुमदुमली : विविध कार्यक्रमात नागरिकांचा सहभाग भद्रावती : आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमेटी किल्ला वार्ड भद्रावतीतर्फे मंगळवारी विठ्ठल रुखमाई पालखीच्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.ढोल ताश्यांच्या गजरात, टाळ, विणा, मृंदग वाजवित वारकरी, भक्तगण जय जय रामकृष्ण हरी..., ज्ञानोबा तुकाराम म्हणत नाचत गात पुढे सरकत होते. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग... यामुळे जणू काही भद्रावतीत पंढरीच अवतरली असा भास होत होता.शोभायात्रेत लोकमान्य विद्यालय भद्रातीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझीम पथक, वाड व वेगवेगळ्या झाक्या आकर्षित करुन टाकणाऱ्या होत्या. शोभायात्रेला विठ्ठल मंंदिरातून सकाळी ९ वाजता सुरुवात झाली. विठ्ठल मंदिर ते जवळे प्लॉट, वाल्मिकी चौक, जुने बसस्थानक, गांधी चौक, पोलीस ठाणे व शेवटी शोभायात्रेची विठ्ठल मंदिर येथे सांगता झाली. पालखी शोभायात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढून भाविकांनी पालखीचे स्वागत केले. पूजाअर्चाही करण्यात आली. यावेळी सगळ्या भक्तगणांनी पावसासाठी साकडे घातले. शोभायात्रेत विविध भजन मंडळ सहभागी झाले होते. शोभायात्रेत श्री विठ्ठल मंदिर देवस्थान कमेटीचे चंद्रकांत गुंडावार, विठ्ठल पारधे, वसंत लोणकर, गोपाल ठेंगणे, प्रा. सुरेश परसावार, प्राचार्य विनोद पांढरे, चंद्रकांत देशपांडे, नामदेव कोल्हे, उल्हास भास्करवार, विठ्ठल देठे, अतकरी महाराज, गारघाटे, अनिल पिट्टलवार, सुलभा मद्दीवार तसेच लोकमान्य विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक तसेच भक्तगण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दुपारी कीर्तन व गोपालकाल्याचे आयोजन करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)