इतर प्राण्यांचाही वावर : माळढोकसह आता वाघाचेही वास्तव्यवरोरा : मागी काही वर्षापासून वरोरा वनपरिक्षेत्राअंतर्गत असलेल्या जंगलात वाघाचे वास्तव्य आढळून आले आहे. यासोबत अत्यंत दुर्मीळ असणारे माळढोक पक्षी मागील १२ वर्षापासून वास्तव्यास आहे. वाघ व माळढोक पक्षाचे वरोरा वनपरिक्षेत्रात कायम वास्तव्य झाल्याने हा परिसर येत्या काही दिवसात पर्यटकांसाठी मेजवाणी ठरणार असल्याचे मानले जात आहे.मागील ५० वर्षात वरोरा वनपरिक्षेत्रात वाघाचे वास्तव्य नसल्याचे आजही जेष्ठ ग्रामस्थ सांगत आहे. मात्र आता काही वर्षात वरोरा वनपरिक्षेत्रात सहा वाघ स्थिराविले असून या वाघांनी अनेकांना दर्शन दिले आहे. वनविभागाच्या कॅमेरामध्ये वाघ ट्रीप झालेले असून वन्यप्राणी गणतीमध्येसुद्धा मागील काही वर्षापासून वाघाची नोंद होत आहे. वरोरा चिमूर मार्गालगत एक वाघीण आपल्या तीन पिल्लासह रस्ता ओलांडत असल्याचे अनेकांनी काही दिवसापूर्वीच बघितले तर या वाघीणीने आपल्या पिल्लासह एका पाळीव प्राण्याची शिकारही त्याच परिसरात केल्याची नोंद आहे. त्यामुळे वाघीणीचे पिल्ले आता मोठे होत असल्याने ते याच परिसरात स्थिरावण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सहामधील एक मादी चंद्रपूर जिल्ह्यासोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये वावरताना दिसते तर एक नर हा ताडोबा नजीकच्या परिसरात वरोरा वनपरिक्षेत्रात मागील काही वर्षापासून वास्तव्यात आहे. वरोरा वनपरिक्षेत्रात ५० वर्षानंतर वाघाचे वास्तव्य सध्या दिसून येत आहे. यासोबतच महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या माळढोक पक्षाचे वास्तव्य आहे. त्यानंतर मागील १२ वर्षापासून वरोरा वनपरिक्षेत्रात दरवर्षी माळढोक पक्षी वास्तव्यास असल्याच्या नोंदी वनविभाग घेत आहे. त्यामुळे आता हा जंगल परिसर पर्यटकांनाही खुणावू लागला आहे. (तालुका प्रतिनिधी)११ माळढोक पक्षीश्रावण महिन्यापासून साधारणत: फेब्रुवारीपर्यंत माळढोक पक्षाचे दर्शन होत असते. सर्वत्र व्याघ्र दर्शनाकरिता नागरिक उत्सुक असतात. वरोरा परिसरात सहा वाघ व जवळपास अकरा माळढोक पक्षी वास्तवास्त असल्याने त्यांची देखरेख व संरक्षण केले जात आहे.
पर्यटकांना खुणावतोयं वरोरा जंगल परिसर !
By admin | Updated: August 14, 2016 00:37 IST